scanning QR code
scanning QR code Sakal
विज्ञान-तंत्र

लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड; काय आहे योजना? वाचा

सकाळ डिजिटल टीम

भारत सरकारचा पोस्ट विभाग देशात डिजिटल एड्रेस कोड (DAC) तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन डिलिव्हरी बुक करण्यासाठी किंवा मालमत्ता कर भरण्यासाठी त्यांचा पत्ता देण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा आगामी काळात ऑनलाइन डिलिव्हरीसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी उपयोग होणार आहे.

सध्या कुरिअर किंवा डिलिव्हरी बॉयला अचूक पत्ता माहिती असूनदेखील बऱ्याचदा तुमचे पार्सल योग्या ठिकाणी पोहोचवता येत नाही. या कामात गुगल मॅपचीही मदत होत नाही. मात्र लवकरच सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक युनिक कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा कोड टाइप करून किंवा क्यूआर कोडप्रमाणे स्कॅन करून, तुम्हाला घराचे अचूक लोकेशन मिळेल. अशाप्रकारे, तुमची अनेक कामे पत्ता न भरता देखील या कोडच्या मदतीने पूर्ण होतील. या कोडमध्ये डिजिटल मॅप देखील पाहता येतील.

DAC कसा बनवायचा

सध्या भारतात सुमारे 75 कोटी घरे आहेत. या सर्व घरांसाठी एक डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल. DAC प्रत्येक पत्त्यासाठी डिजिटल ऑथेंटिकेशन करण्यात येईल. डिजिटल अॅड्रेस कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची यूनिक आयडेंटीफिकेशन केले जाईल. आणि पत्ता जियोस्पेशियल कोऑर्डिनेट्सशी (geospatial coordinates) जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा पत्ता हा रस्त्या किंवा गल्ली नव्हे तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकेल. हा कोड कायमस्वरूपी कोड असेल.

DAC कसे काम करेल

पोस्ट ऑफ कम्युनिकेशन्स विभागाकडून या प्रस्तावावर आधीच अभिप्राय मागविण्यात आले होते, ज्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर रोजी संपली होती. त्यामुळे लवकरच प्रत्येक घराचा डिजिटल युनिक कोड असेल. तो पिन कोडला रिप्लेस करेल. हे प्रत्येक घरासाठी डिजिटल को- ऑर्डिनेटर म्हणून काम करेल. नवीन सिस्टीम प्रत्येक घराला वेगळा कोड देईल म्हणजेच एका इमारतीत 50 फ्लॅट असतील तर प्रत्येक फ्लॅटला वेगळा कोड असेल. दुसरीकडे, जर दोन कुटुंब एका घराच्या दोन मजल्यावर राहत असतील तर दोन कोड तयार होतील.

काय फायदा होईल

  • प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाइन व्हेरिफाय केला जाऊ शकेल. बँकिंग, विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी सोप्या पध्दतीने केले जाईल.

  • ई-कॉमर्ससारख्या सेवेसाठी DAC खूप उपयुक्त ठरू शकते.

  • सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी DAC खूप मदत करेल. तसेच फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

  • मालमत्ता, कर आकारणी, आपत्ती व्यवस्थापन आणि जनगणना आणि लोकसंख्या नोंदी तयार करण्यात मदत होईल.

  • डीएसी वन नेशन वन अॅड्रेसचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT