Simcard and Whatsapp Account Block : देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक कारवाई सुरु केली आहे. या फसवणुकीमध्ये फसव्या सिम कार्ड्स आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केला जातो, आणि सरकारने यावर तातडीने पावले उचलली आहेत. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत, 7,80,000 पेक्षा जास्त सिम कार्ड्स, 3,000 पेक्षा जास्त स्काइप आयडी आणि 83,000 व्हॉट्सअॅप अकाऊंट्स ब्लॉक केले गेले आहेत. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री राज्य मंत्री, बंडी संजय कुमार यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
सरकार सायबर क्राईमविरोधी कारवाईसाठी कडक पावले उचलत आहे. गृहमंत्रालयाच्या I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) ने 3,962 स्काइप आयडी आणि 83,668 व्हॉट्सअॅप अकाऊंट्स ब्लॉक केले आहेत. या सर्व अकाऊंट्सचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जात होता. मोदी सरकारने 2021 मध्ये सुरु केलेल्या I4C एजन्सीने आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर झटपट प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत I4C ने 13.36 लाख तक्रारींवर कार्यवाही करत 4,389 कोटी रुपयांचे रक्कम वाचवली आहे.
संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत, सायबर फसवणुकीशी संबंधित 7,81,000 पेक्षा जास्त सिम कार्ड्स ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, 2,08,469 IMEI नंबर देखील ब्लॉक करण्यात आले आहेत, जे पोलिस आणि इतर तपास एजन्सींनी चिन्हित केले होते. प्रत्येक मोबाईल डिव्हाइसला एक युनिक IMEI नंबर असतो आणि हे ब्लॉक केलेले डिव्हाइस ऑनलाईन गुन्हेगारी क्रियांमध्ये वापरले जात होते.
सायबर फसवणुकीच्या शिकार झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारने 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइन नंबरची स्थापना केली आहे. या हेल्पलाइनवरून नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात आणि त्यांना आवश्यक असलेली मदत मिळेल.
सार्वजनिक सहाय्यासाठी, नागरिक संचार साथी पोर्टलद्वारे स्पॅम कॉल्स आणि फसव्या कॉल आणि चॅटची तक्रार करू शकतात. दूरसंचार विभागाने काही वर्षांपूर्वी या पोर्टलची सुरुवात केली होती आणि याच पोर्टलचा अॅप आता गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
दुसरीकडे, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घोषणा केली की, बीएसएनएलची 5G सेवा जून महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. बीएसएनएलचे सीएमडी, रॉबर्ट जे. रवी यांनी 5G सेवा सुरू होणार असलेल्या ठिकाणांची माहिती दिली आहे.
सरकारच्या या कठोर पावलांमुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये निश्चितच घट होईल आणि जनतेच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.