Hero Xpulse
Hero Xpulse Esakal
विज्ञान-तंत्र

Xpulse 200 4V : नव्या रुपात लाँच झाली हीरोची जबरदस्त ऑफरोडिंग बाईक! जाणून घ्या नवे फीचर्स आणि किंमत

सकाळ डिजिटल टीम

ऑफरोडिंग बाईक्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. हीरो मोटोकॉर्पने आपली प्रसिद्ध बाईक एक्सपल्स २०० ४व्ही (Hero Xpulse 200 4V) ही नव्या रुपात लाँच केली आहे. कंपनीने बाईकच्या लुक्स आणि फीचर्समध्ये काही बदल केले आहेत. ऑफरोडिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी यामध्ये तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.

दोन व्हेरियंट, चार नवे रंग

हीरोने आपल्या या बाईकला (Hero New Bike) केवळ नवीन रुपातच नाही, तर दोन नवीन व्हेरियंटमध्येही लाँच केले आहे. स्टँडर्ड आणि प्रो असे हे दोन व्हेरियंट आहेत. यासोबतच, कंपनीने हे व्हेरियंट चार नवीन पेंट स्कीममध्ये लाँच केले आहेत. यात मॅट नेक्सस ब्लू, टेक्नो ब्लू, ब्लॅक स्पोर्ट्स रेड आणि रॅली एडिशन ग्राफिक्सचा समावेश आहे.

बाईकच्या प्रो व्हेरियंटमध्ये २५० मिमीचे फुल्ली एडजस्टेबल फ्रंट सस्पेंशन आणि २२० मिमीचे १०-स्टेप एडजस्टेबल रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. यासोबतच प्रो व्हेरियंटमध्ये लांब सीट दिली आहे, आणि उंचीदेखील वाढवण्यात आली आहे. ऑफ-रोडिंग अनुभव आणखी चांगला होण्यासाठी अधिक ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आला आहे, तसेच हँडल बारही वरती उचलला आहे.

काय आहेत फीचर्स

नवीन एक्स पल्स २०० ४व्ही बाईकमध्ये ६० मिमी लांब वाईजर, अपडेटेड स्विच गिअर, ऑल एलईडी हेडलॅम्प, अपडेटेड रायडर ट्राएंगल आणि H आकाराच्या एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आल्या आहेत. नवीन रायडर ट्राएंगलमुळे चालवणाऱ्या व्यक्तीच्या पायाची री-पोझिशनिंग अधिक चांगली राहते. यासोबतच, पुढच्या बाजूला असणाऱ्या फुट पेगला ३५ मिमी, तर मागच्या बाजूला असणाऱ्या फुट पेगला ८ मिमी खाली करण्यात आले आहे.

नवीन बाईकमध्येही जुन्या मॉडेलप्रमाणेच १९९.६ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर, ऑईल-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड, फोर स्ट्रोक, फोर वॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८,५०० आरपीएम वर १८.९ बीएचपी पावर आणि ६,५०० आरपीएम वर १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

इंजिनमध्ये करण्यात आलेला मुख्य बदल म्हणजे, हे आता ओबीडी-२ अनुकूल असून, ई२० इंधनावरही चालू शकते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येते.

तीन रायडिंग मोड्स

यासोबतच, नवीन मॉडेलमध्ये तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. रोड, ऑफ-रोड आणि रॅली असे हे तीन मोड्स आहेत. रोड मोडवर एबीएसला ब्रेकिंग परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी आणि स्लिप कमी करण्यासाठी ट्यून करण्यात आले आहे.

ऑफ-रोड मोडमध्ये इंटर्वेशनचा स्तर कमी होतो, ज्यामुळे अधिक स्लिप आणि जास्त कंट्रोलसह लॉकची सुविधा मिळते. रॅली मोडमध्ये फ्रंट व्हीलवर असणारे एबीएस पूर्णपणे बंद होते, आणि पूर्णपणे फ्रंटवर फुल लॉक सुविधा मिळते. प्रोफेशनल रॅली रायडर्सना डोळ्यासमोर ठेऊन हे फीचर देण्यात आले आहे.

एक्सपल्स २०० ४व्हीच्या स्टँडर्ड व्हेरियंटची किंमत १.४४ लाख (एक्स शोरूम) आहे, तर प्रो व्हेरियंटची किंमत १.५१ लाख (एक्स शोरूम) आहे. यासाठी सर्व हीरो डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे, आणि येत्या काही दिवसांतच डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT