GPT-4o Video eSakal
विज्ञान-तंत्र

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

GPT-4 नंतर आलेल्या या मॉडेलचं नाव GPT-4o असं ठेवलं आहे. यातील 'O' या अक्षराचा अर्थ Omni असा आहे.

Sudesh

OpenAI GPT 4o Launched : काही दिवसांपूर्वीच ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी चॅटजीपीटीला अगदी साधं एआय टूल म्हटलं होतं. भविष्यातील एआय टूल्स त्या तुलनेत अगदीच अ‍ॅडव्हान्स असतील असं त्यांना सुचवायचं होतं. यानंतर आता कंपनीने एक नवा एआय चॅटबॉट लाँच केला आहे. हे नवीन मॉडेल सध्याच्या एआय टूल्सपैकी सगळ्यात स्मार्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

माणूस अन् मशीनमधील संवाद

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एआय टूल मानव आणि मशीनमधील संवाद वाढवण्यासाठी आणलं आहे. हे मॉडेल रिअल-टाईम टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ बेस्ड आहे. म्हणजेच, हे एआय मॉडेल केवळ टेक्स्ट आणि ऑडिओच नाही तर इमेज आणि व्हिडिओंना देखील समजू शकतं. तसंच तुमच्या प्रश्नांना रिअल टाईम उत्तरे देऊ शकतं.

ओपन एआयने आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत GPT-4o कसं काम करतं याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये दिसतंय की एक व्यक्ती या एआय टूलसोबत चक्क मैत्रिणीशी गप्पा माराव्या त्याप्रमाणे बोलत आहे. हे टूल त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काय झालंय असंही विचारतं. तसंच तो ज्या रुममध्ये बसला आहे हे पाहून "तू नक्कीच व्हिडिओ प्रॉडक्शन सेटवर आहेस" असंही बोलून दाखवतं.

मोफत मिळणार अ‍ॅक्सेस

ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत अधिक माहिती दिली. हे एक मल्टिमॉडेल एआय आहे. तसंच यामध्ये स्वतः कंटेंट जनरेशनची क्षमताही आहे. तसंच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे टूल GPT यूजर्सना मोफत मिळणार आहे. जगातलं सर्वात अत्याधुनिक एआय टूल बनवून, ते मोफत आणि जाहिरातींशिवाय उपलब्ध करणं ही अभिमानाची बाब आहे, असंही सॅम म्हणाले.

GPT-4 नंतर आलेल्या या मॉडेलचं नाव GPT-4o असं ठेवलं आहे. यातील 'O' या अक्षराचा अर्थ Omni असा आहे. यासोबतच कंपनी GPT-5 आणि GPT-6 वर देखील काम करत असल्याची माहिती सॅम यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT