mobile overheating problem
mobile overheating problem Esakal
विज्ञान-तंत्र

तुमचा मोबाईलही होतोय Overheat, मग या ट्रीक वापरून होईल Cool Down

Kirti Wadkar

स्मार्टफोन हा आता आपल्याय प्रत्येकासाठी अगदी महत्वाची वस्तू ठरतोय. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासोबतच मोबाईलमुळे Mobile अनेक कामं एकाचवेळी करणं शक्य होतं. मग ते ऑनलाईन पेमेंट असो किंवा सोशल मीडियाचा Social Media वापर किंवा मनोरंजन. How To Keep your Mobile Cool what to do when overheated

एकाचवेळी आपण अनेकदा स्मार्टफोनवर Smart Phone अनेक गोष्टी करत असतो. यामुळेच तुमच्या पैकी अनेकांना फोन ओव्हरहीट होण्याची म्हणजेच गरम होण्याची समस्या भेडसावत असेल. मोबाईल ओव्हरहिट होणं ही तशी सामान्य समस्या आहे.

मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे मोबाईल बिघडण्याची आणि तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठीच मोबाईल थंड Mobile Cooling राहील हे पाहणं किंवा तो वेळेत कुल डाउन करणं गरजेचं आहे.

मोबाईल कुल डाउन करण्यासाठी काय करावं हे जाणून घेण्यापूर्वी मोबाईल ओव्हरहिट होण्यामागे कोणती कारणं जबाबदार आहेत हे जाणून घेतल्यास आपल्याला अधिक काळजी घेणं आणि मोबाईल ओव्हरहीट होण्यापासून रोखणं सोप होईल.

१. एकाचवेळी अनेक कामं - मोबाईलवर एकाच वेळी जर तुम्ही अनेक अॅक्टिव्हिटी करत असाल तर मोबाईल गरम होण्याची शक्यता वाढते. म्हणजे एकाच वेळी जर तुम्ही गेम खेळता खेळता गाणी ऐकत आहात किंवा फोन चार्जिंगला लावून कॉलवर बोलत आहात तर अशा वेळी फोन ओव्हरहिट होतो.

तसंच एकाच वेळी अनेक अॅप्सचा वापर करत असताना मोबाईल गरम होऊ शकतो. तसंच अनेकदा आपण अनेक बिनाकामाचे अॅप्स Mobile Apps देखील इंन्स्टॉल करतो. यामुळे प्रोसेसेवर जास्त भार येऊन जास्त बॅटरी कंझ्युम होत असल्याने मोबाईल ओव्हरिट होतो.

हे देखिल वाचा-

नेटवर्क केनेक्टिविटी- जर वेळोवेळी नेटवर्क बदलत असेल म्हणजेच कधी 4G तर 5G असं नेटवर्क सतत बदलत असेल किंवा नेटवर्क येत जात असेल तर बॅटरी ओव्हरहिट होते आणि यामुळे देखील फोन जास्त गरम होवू शकतो.

२. उन्हामध्ये फोनवर बोलणं- जर तुम्ही कुठे बाहेर फिरत असाल आणि ऊन असेल तर मोबाईल कव्हरमुळेदेखील मोबाईल ओव्हरहिट होतो. तसंच जर तुमच्या हातून मोबाईल जर जोरात पडला असेल तर बॅटरी आतून डॅमेज झाल्याने देखील मोबाईल ओव्हरहिट होवू शकतो.

मोबाईल कुल डाउन कसा करावा

मोबाईल ओव्हरहिट झाल्यानंतर सर्वप्रथम तो स्विचऑफ करावा. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मोबाईल पुन्हा सुरू करावा. मोबाईल स्विच ऑफ करून सुरु केल्यानंतरही जर मोबाईल पुन्हा वारंवार गरम होत असले तर तुम्हाला मोबाईलची सेटिंग चेक करावी लागेल.

मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन कोणतं अॅप जास्त डेटा आणि बॅटरी कंज्युम करतंय हे पहावं लागेल. जर यातील काही अॅप तुम्ही जास्त वापरत नसाल किंवा जास्त गरजेचे नसतील तर ते Uninstall करा.

थर्ड पार्टी चार्जरचा वापर टाळा

जर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ओरिजनल चार्जर व्यतिरिक्त इतर कंपनीचा चार्जर वापरल्यासही मोबाईल गरम होवू शकतो. तसंच जर तुम्ही मोबाईलची बॅटरी बदलून इतर कंपनीची बॅटरी बसवली असेल तरीही मोबाईल गरम होवू शकतो. यासाठी मोबाईलसोबत मिळालेला किंवा त्यातल्या कंपनीचा चार्जर वापरावा.

हे देखिल वाचा-

जंक फाईल क्लिन करा

तसंच जर मोबाईलमध्ये जंक फाइल्स असतील तर त्या वेळोवेळी क्लिन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये असलेल्या क्लीनरचा वापर करू शकता किंवा काही अॅपच्या मदतीने या जंक फाइल क्लिन करू शकता.

सर्व उपाय करूनही जर मोबाईल ओव्हरहिट होत असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन दाखणं कधीही योग्य पर्याय ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT