pan card details update nsdl utiitsl esakal
विज्ञान-तंत्र

Pan Card Update : पॅनकार्डवरील माहिती बदलायची आहे? चिंता कशाला, घरबसल्या मोबाईलवरुन करा अपडेट; सोप्या स्टेप्स वाचा एका क्लिकमध्ये..

Pan Card Details Change Update Online and Offline Process : पॅनकार्ड वरील नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, सही, आधार, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यासारख्या माहितीचे अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे.

Saisimran Ghashi

Pan Card Details Update Steps : पॅन कार्ड हे ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज असून, इन्कम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक आहे. यावर आपल्या नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, सही, आधार, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यासारख्या माहितीचे अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. कोणतीही माहिती चुकीची असल्यास किंवा बदल झाल्यास, वेळेत पॅन कार्ड अद्ययावत करणे उपयुक्त ठरते. तुम्ही पॅन कार्डचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व जन्मतारीख ऑनलाइन बदलू शकता.

ऑनलाइन पद्धत

आपण NSDL किंवा UTIITSL वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड अपडेट करू शकता. जर तुमचा पॅन कार्ड अर्ज NSDL वरून केला असेल तर NSDL च्या वेबसाइटवरून आणि UTIITSL वरून केला असल्यास तिथून अद्ययावत करणे सोयीचे ठरेल.

NSDL पद्धती

1. NSDL पोर्टलवर जाऊन ‘सर्व्हिसेस’ टॅबमधून ‘PAN’ निवडा.

2. ‘Change/Correction in PAN Data’ विभागात ‘Apply’ पर्याय निवडा.

3. आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा आणि आधारद्वारे ई-साइन निवडून डिजिटल प्रक्रिया पूर्ण करा.

4. आवश्यक माहिती, पत्ता किंवा संपर्क बदलून पुढे जा.

5. अर्ज भरणे, देयक प्रक्रिया पूर्ण करून OTP द्वारे अर्ज सबमिट करा.

UTIITSL पद्धती

1. UTIITSL वेबसाइटवर जाऊन ‘Change/Correction in PAN Card’ पर्याय निवडा.

2. पॅन क्रमांकासह माहिती अपडेट करा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

3. ऑनलाइन देयक भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.

ऑफलाइन पद्धत

तुम्ही जवळच्या पॅन केंद्रात अर्ज करून अद्ययावत करायची माहिती देऊ शकता. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून पॅन केंद्रात जमा करा आणि 15 दिवसांच्या आत अद्ययावत पॅन कार्ड मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT