India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1  
विज्ञान-तंत्र

India 5G Launch: देशात उद्यापासून मिळणार 5Gसेवा; PM मोदी करणार सुरूवात

सकाळ डिजिटल टीम

India 5G Launch in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवेची सुरूवात करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल आणि व्होडाफोन इंडियाचे कुमार मंगलम बिर्ला हे देखील उपस्थित राहणार आहेत.

5G ची यशस्वी चाचणी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशात चार ठिकाणी आधीच केली आहे आणि 5G लाँच होताच या चार ठिकाणी 5G सेवा सुरू होऊ शकते. या चार ठिकाणांमध्ये दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरूची मेट्रो, कांडला बंदर आणि भोपाळची स्मार्ट सिटी यांचा समावेश आहे. चाचणीमुळे या चार ठिकाणी 5G ची संपूर्ण पायाभूत सुविधाही तयार आहे.

4G च्या किमतीत उपलब्ध होऊ शकते 5G सेवा

टेलिकॉम कंपनीच्या सूत्रांनुसार, सध्या ग्राहकांना 4G पॅकच्या किंमतीवर 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे. 5G पॅक संपूर्ण देशात लागू झाल्यानंतरच त्याची किंमत वाढेल. तथापि, एरिक्सनच्या रिपोर्टनुसार 5G वापरासाठी 52 टक्के ग्राहक पुढील 12 महिन्यांत त्यांचा डेटा प्लॅन अपग्रेड करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, 59 टक्के स्मार्टफोन वापरकर्ते त्यांची सेवा 5G वर अपग्रेड करण्यास तयार आहेत. तथापि, भारतातील 25 टक्के ग्राहक केवळ 2G सेवेशी जोडलेले आहेत.

Jio आणि Airtel 5G सुरू करणार आहेत

रिलायन्स आणि एअरटेलनेही ऑक्टोबरमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र याबाबत व्होडाफोनकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. रिलायन्सने दिवाळी दरम्यान देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G आणि 2023 च्या अखेरीस देशातील सर्व मोठ्या आणि लहान शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलने 5G च्या यशस्वी चाचण्या देखील केल्या आहेत आणि ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यास तयार आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, 5G सेवा केवळ 4G सिमवरून मिळू शकते, त्यामुळे ग्राहकांना 5G सेवा घेण्यासाठी सिम किंवा फोन बदलावा लागणार नाही. 4G सेवा प्रदान करण्यास सक्षम असलेल्या बहुतेक फोनवर 5G सेवा देखील उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्‍यावर दोन मंडळांच्‍या कार्यकर्त्यांचा राडा

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT