विज्ञान-तंत्र

धक्कादायक! भारतातील सर्वात मोठे डेटा लिक प्रकरण? ICMR कडील 81.5 कोटी नागरिकांची माहिती विक्रीसाठी उपलब्ध

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ८१.५ कोटी भारतीय नागरिकांचा खासगी डेटा लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. देशातील हे सर्वात मोठे डेटा लिक प्रकरण असल्याची शक्यता आहे. कोरोना काळात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने भारतीय लोकांचा डेटा गोळा केला होता. हाच डेटा आता विक्रीसाठी उपबल्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 'न्यूज१८' ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

थ्रेट अॅक्टर (threat actor) नावाच्या हँडलवरुन एक्सवर एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये डार्क वेबवर ८१.५ कोटी नागरिकांच्या डेटाची जाहीरात करण्यात आली आहे. नागरिकांच्या माहितीमध्ये आधार, पासपोर्टची माहिती, नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता अशा माहितीचा समावेश आहे. थ्रेट अॅक्टरने दावा केलाय की, कोरोना रुग्णांची आयसीएमआरकडे असलेली ही माहिती आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा लिक होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेत केंद्रीय अन्वेषण विभागाने याची दखल घेत तपासाची तयारी सुरु केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने याप्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयसीएमआरवर अनेर सायबर अटॅक झाले आहेत. मागील वर्षी आयसीएमआरचे सर्व्हर हॅक करण्यासाठी तब्बल ६ हजार प्रयत्न झाले आहेत. अशा प्रकारचा डेटा लिक होऊ नये यासाठी एजेन्सीने खबरदारी घेण्यास सांगितले आहे. दाव्यानुसार डेटा लिक प्रकरणी देशाबाहेरील शक्तींचा हात असू शकतो.

कोरोना काळामध्ये भारतीय नागरिकांनी आपल्या खाजगी माहितीसह शासकीय यंत्रणेकडे नोंदणी केली होती. ही माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र National Informatics Centre, आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाकडे साठवण्यात येते. त्यामुळे माहिती नेमकी कोठून लिक झाली याचा शोध तपास यंत्रणा घेणार आहेत. आरोग्य यंत्रणेला लक्ष्य करण्यात आल्याची ही पहिली वेळ नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT