India Data Centers eSakal
विज्ञान-तंत्र

Data Centers : देशातील डेटा सेंटर्सची संख्या वाढली, जगात 14व्या क्रमांकावर झेप!

भारतातील इंटरनेट यूजर्सची वाढती संख्या पाहता, देशात आणखी डेटा सेंटर्सची नितांत गरज आहे.

Sudesh

कोरोना काळानंतर जगभरातील डेटा सेंटर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये भारत देखील मागे नसून, देशात 151 डेटा सेंटर्स आहेत. सर्वाधिक डेटा सेंटर असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात 14व्या क्रमांकावर आहे. अर्थात, भारतातील इंटरनेट यूजर्सची वाढती संख्या पाहता, देशात आणखी डेटा सेंटर्सची नितांत गरज आहे.

बिझनेस इन्सायडरने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सर्वाधिक डेटा सेंटर असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये तब्बल 5,375 डेटा सेंटर आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकाावर जर्मनी (522) आणि तिसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम (517) आहेत. चौथ्या क्रमांकावर चीन (448) आणि पाचव्या क्रमांकावर कॅनडा (335) आहे.

भारतात इंटरनेट यूजर्सची संख्या सुमारे 880 दशलक्ष एवढी आहे. ही संख्या अमेरिकेच्या दुप्पट आणि यूकेच्या तुलनेत 12 पट अधिक आहे. असं असतानाही अमेरिका आणि यूकेमध्ये भारतापेक्षा कित्येक पटींनी अधिक डेटा सेंटर्स आहेत. (Tech News)

काय असतात डेटा सेंटर?

इंटरनेट यूजर्सचा डेटा साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचे वाटप करणे यासाठी डेटा सेंटर उभारण्यात आलेले असतात. याठिकाणी कित्येक कम्प्युटर, स्टोरेज सिस्टीम, कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा गोष्टींची गरज भासते.

सध्या मुंबईमध्ये देशातील सर्वाधिक (50) डेटा सेंटर आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई (14) आहे. त्यानंतर दिल्ली (11), बंगळुरू (10), पुणे (9) आणि हैदराबादचा (5) क्रमांक लागतो. 2026 सालापर्यंत मुंबईमध्ये आणखी 47 डेटा सेंटर उभारण्याची क्षमता आहे. तर, हैदराबादमध्ये आणखी 13 डेटा सेंटर्स उभारण्याची क्षमता असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT