Sustainable Polymers Developed by Indian Researchers to Tackle Plastic Pollution Crisis esakal
विज्ञान-तंत्र

Plastic Pollution Crisis : कार्बन उत्सर्जन पूर्णपणे थांबणार? संशोधकांनी बनवलं स्वतःला 'Heal' करणारं पॉलिमर,जाणून घ्या कसा होतो वापर

Self-Healing Polymers : औद्योगिक कचऱ्यापासून बनलंय हे पर्यावरणपूरक पॉलिमर,प्लास्टिक प्रदूषण घटणार

Saisimran Ghashi

Research : प्लास्टिक प्रदूषणाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी शिव नादर विद्यापीठातील संशोधकांनी आधुनिक आणि टिकाऊ पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी औद्योगिक कचऱ्यापासून बनवलेले Self Heal करणारे पॉलिमर तयार केले आहेत.

रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक बिंबेश लोचाब आणि डॉ. संगीता साहू यांनी महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवून कचऱ्यापासून बनवलेल्या नवीन जनरेशन पॉलिमरची ओळख करून दिली आहे. त्यांचं ध्येय आहे - कार्बन उत्सर्जन पूर्णपणे थांबवणे.

पेट्रोलियम रिफायनरी उद्योगांमधून मिळणाऱ्या सल्फर आणि काजू उद्योगाच्या कचऱ्यातून मिळणाऱ्या कार्डानॉल यांचा वापर करून हे पॉलिमर तयार केले आहेत. हे पर्यावरणपूरक पर्याय पारंपारिक पेट्रोकेमिकल प्लास्टिकचं स्थान घेऊ शकतात.सर्वात महत्वाचं म्हणजे, या पॉलिमरची निर्मिती सोपी आहे. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये त्याचा वापर करणे सोईस्कर ठरेल.हे संशोधन ACS जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

संशोधनकर्त्यांच्या मते, हे पॉलिमर नवीन जनरेशनच्या 'विट्रीमर्स' या गटात येतात. या पॉलिमरची खास गोष्ट म्हणजे, आपण त्यांना पुन्हा आकार देऊ शकता आणि पुनर्वापर करू शकता, तसंच ते टिकून राहतात. जसं मानवी त्वचा जखमा भरून काढते तसं हे पॉलिमर विशिष्ट तापमानाला कार्यरत होऊन स्वतःची दुरुस्ती करतात.

पर्यावरणपूरक रसायनांचा वापर करून हे संशोधक या कचऱ्यापासून बनवलेल्या पॉलिमरचा विविध क्षेत्रात वापर करण्याची शक्यता पाहत आहेत. यामध्ये लवचिक लेपण, मजबूत adhesive आणि बॅटरी तंत्रज्ञानासाठी ज्वलनरोधक सामग्रीचा समावेश आहे.

कार्डानॉल बेंझोक्सझाइन-सल्फर पॉलिमर यांची पुनर्प्रक्रिया (Recycling), पुन्हा वापर (Reprocessing), स्व-उपचार (Self-Healing) आणि आकार पुन्हा प्राप्त करणे (Shape Recovery) (R2S2) ही वैशिष्ट्ये त्यांच्या Versatility आणि विविध उद्योगांमधील उपयुक्तता अधोरेखित करतात. विशेष म्हणजे, यांची पुन्हा जोडण्याची adhesive चीज, भार सहन करण्याची क्षमता आणि आकार पुन्हा प्राप्त करण्याची क्षमता हे टिकाऊपणा आणि पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरू शकते.

डॉ. बिंबेश लोचाब म्हणाले, "हा पदार्थ अल्युमिनियम-अल्युमिनियम, स्टील-स्टील आणि अल्युमिनियम-स्टील सारख्या धातूच्या पृष्ठभागांवर खूप चांगला चिकटतो. त्याची चिकटण्याची क्षमता आणि मजबुती ही उल्लेखनीय आहे."

या adhesive चा वापर केल्यावर संबंधित धातूचा पृष्ठभाग पुन्हा वापरता येतात. त्यामुळे कचरा कमी होतो आणि पुनर्वापराचा वाढतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT