Emergency Alert Test eSakal
विज्ञान-तंत्र

Emergency Alert : भारत सरकारने अँड्रॉईड मोबाईलवर पाठवला 'इमर्जन्सी अलर्ट'; काय आहे याचा अर्थ?

Sample Testing Message : दुपारी 12:19 वाजेच्या सुमारास कित्येक अँड्रॉईड मोबाईलमध्ये एकाच वेळी मोठ्याने बीप वाजून हा अलर्ट मिळाला.

Sudesh

देशभरातील कित्येक अँड्रॉईड मोबाईल यूजर्सना आज एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. दुपारी 12:19 वाजेच्या सुमारास कित्येक अँड्रॉईड मोबाईलमध्ये एकाच वेळी मोठ्याने बीप वाजून हा अलर्ट मिळाला. यावर 'इमर्जन्सी अलर्ट : सीव्हिअर' असं लिहिलं होतं.

या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की "हा एक सॅम्पल टेस्टिंग मेसेज आहे. भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागातील सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमने हा मेसेज पाठवला आहे. कृपया हा मेसेज इग्नोर करा. यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही."

"हा मेसेज केवळ पॅन-इंडिया इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमच्या चाचणीसाठी आहे. ही सिस्टीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राबवण्यात येत आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीवेळी त्यांना वेळी सूचना देण्यासाठी याचा वापर होणार आहे." असंही यात म्हटलं आहे.

यापुढेही मिळतील अलर्ट

यापूर्वी 20 जुलै आणि 17 ऑगस्ट रोजी देखील अशा प्रकारचे अलर्ट देशभरातील अँड्रॉईड यूजर्सना मिळाले होते. ही चाचणी वेळोवेळी घेण्यात येणार असून, यापुढेही असे अलर्ट मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

कशासाठी आहे ही सिस्टीम?

एखाद्या नैसर्गिक आपत्तीवेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी अलर्ट आणि धोक्याची सूचना देता यावी, यासाठी ही सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. भूकंप, त्सुनामी, महापूर अशा संकटांवेळी जेव्हा मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट बंद असेल तेव्हादेखील या माध्यमातून लोकांना संदेश पाठवणं शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT