Instagram down in india users report issues esakal
विज्ञान-तंत्र

Instagram Outage in India: भारतात इंस्टाग्राम झाले डाऊन; लाखो वापरकर्त्यांची तक्रार,नेमकं कारण काय?

Instagram down in india users report issues : इंस्टाग्रामचे लाखो वापरकर्ते अ‍ॅप डाऊन असल्याची तक्रार करत आहेत.

Saisimran Ghashi

Instagram Down in India : आज सकाळी भारतातील लाखो इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी अ‍ॅप चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची तक्रार केली आहे. Downdetector, ही आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे सकाळी 11.15 वाजता या समस्या मोठ्या प्रमाणात आढळू लागल्या. इंस्टाग्राम वापरकर्त्यांना अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्यास त्रास होत आहे, तसेच काही वापरकर्त्यांनी फीड रिफ्रेश होण्यात अडचणी जाणवल्या आहेत.

अनेक वापरकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर इंस्टाग्राम न चालण्याबाबतच्या तक्रारी व्यक्त केल्या आहेत. सध्या हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे की अन्य देशांमध्येही अशी परिस्थिती आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंस्टाग्रामकडून अजूनही या समस्येवर कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही, मात्र तांत्रिक गडबडीमुळे ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Downdetector च्या डेटानुसार, हा आउटेज भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पाहिला जात आहे.

जसजसा वेळ जात आहे तसतसे इंस्टाग्रामची सेवा कधी पूर्ववत होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT