iQO 7 
विज्ञान-तंत्र

26 एप्रिलला भारतात सुरू होणार आयक्यूओ 7 सीरीज; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

सुस्मिता वडतिले

पुणे : आयक्यूओ 7 (iQO 7) सीरीजबद्दल बर्‍याच दिवसांपासून बातम्या येत आहेत आणि अलीकडेच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स अ‍ॅमेझॉन इंडियावर सूचीबद्ध झाला आहे. यामुळे हे स्पष्ट होते की आयक्यूओ 7 सीरीज केवळ Amazonवर उपलब्ध असेल. त्याचबरोबर कंपनीने या स्मार्टफोनची भारतीय लॉन्चिंग तारीखही उघड केली आहे आणि त्यासाठी यूजर्सना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे 26 एप्रिलला सुरु होणार आहे. यापूर्वी हे चीनमध्ये सुरू करण्यात आले आहे.

आयक्यूओ 7 लॉन्चिंग डेट

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि अशी माहिती दिली आहे की, आयक्यूओ 7 सीरिज भारतात 26 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. तथापि, या मालिकेअंतर्गत बाजारात येणार असलेल्या स्मार्टफोनचे नाव जाहीर केले गेले नाही. पण हे स्पष्ट आहे की आयक्यूओ 7 भारतात प्रवेश करेल.

आयक्यूओ 7 अपेक्षित किंमत

चीनमध्ये यापूर्वी आयक्यूओ 7 लॉन्च करण्यात आला होता, जिथे हा स्मार्टफोन ब्लॅक, लेटेंट ब्लू आणि लेजेंडरी एडिशन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हे दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये बाजारात आणले गेले असून त्याची किंमत सीएनवाय 3,798 म्हणजेच सुमारे 43,100 रुपये आहे. अशी अपेक्षा आहे की भारतात हा फोन 40,000 रुपयांची किंमत असू शकेल.

आयक्यूओ 7 ची संभाव्य वैशिष्ट्ये

अ‍ॅमेझॉन इंडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयक्यूओ 7 ची डिझाइन खूप नाविन्यपूर्ण असेल आणि बीएमडब्ल्यूच्या पार्टनरशिपमध्ये डिझाइन केले गेले आहे. हे लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 (Qualcomm Snapdragon 888) प्रोसेसर वर देण्यात येईल आणि 66W फ्लॅश चार्ज सपोर्ट असेल ज्याच्या मदतीने फोनची बॅटरी फक्त 22 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. फोनमध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि 48MPचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT