Solar Eruption Aditya L1 eSakal
विज्ञान-तंत्र

Solar Eruption : सूर्यावर झाले दोन दशकातील सर्वात मोठे विस्फोट; 'Aditya L1' आणि 'Chandrayaan-2' ने टिपले खतरनाक फोटो

इस्रोच्या या उपग्रहांना सौरवादळाचा जोरदार तडाखा बसला. मात्र ते सुस्थितीत असून, त्यांनी सूर्यावरील विस्फोटांचे फोटोही घेतल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

Sudesh

Aditya L1 captures strongest solar eruption : गेल्या आठवड्यात 10 आणि 11 मे रोजी पृथ्वीला जबरदस्त सौरवादळांचा तडाखा बसला होता. या वादळामुळे पृथ्वीवर ठिकठिकाणी आकाशात विहंगम दृष्य पहायला मिळालं. मात्र अंतराळात एल-1 बिंदूवर असणाऱ्या 'आदित्य' आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान-2 साठी परिस्थिती वेगळी होती. इस्रोच्या या उपग्रहांना सौरवादळाचा जोरदार तडाखा बसला. मात्र ते सुस्थितीत असून, त्यांनी सूर्यावरील विस्फोटांचे फोटोही घेतल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यावरील झालेल्या या विस्फोटांमुळे M आणि X स्तराच्या सौरलाटा निर्माण झाल्या. यामुळेच पृथ्वीला सौरवादळाचा तडाखा बसला. हे दोन दशकांमधील सर्वात मोठे सौरवादळ होतं. यापूर्वी 2003 साली आलेल्या अशाच मोठ्या सौरवादळाला 'हॅलोवीन स्टॉर्म' असं म्हटलं जातं.

सुमारे 21 वर्षांनी आलेल्या या मोठ्या सौर-वादळामुळे जगभरातील शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. या वादळाची जिओमॅगनेटिक इंडेक्स 9 पर्यंत पोहोचली होती. सौरवादळांचा हा सर्वोच्च स्तर आहे. या सौरवादळाचा तडाखा पृथ्वीला बसला तेव्हा भारतात दिवसाची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे आपण अधिक सुरक्षित राहिलो असंही इस्रोने सांगितलं आहे. अमेरिकेत मात्र बऱ्याच ठिकाणी या वादळाचा फटका बसलेलं दिसून आलं.

आदित्यच्या कोणत्या उपकरणाने टिपले फोटो?

आदित्य उपग्रहावरील ASPEX या पेलोडने सूर्याचे फोटो क्लिक केले आहेत. यामध्ये सौरलाटांची गती, तापमान आणि प्लाझ्माचा प्रवाह स्पष्टपणे दिसत आहे. या पेलोडवर असणाऱ्या स्पेक्ट्रोमीटरचा मोठा फायदा झाला. Aditya L1 वरील Solex या उपकरणाने देखील कित्येक एक्स आणि एम क्लास फ्लेअर्सचा फोटो घेतला आहे. याव्यतिरिक्त चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने देखील सौरवादळाचे फोटो टिपले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT