Aditya L1 Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Mission : 'एल-1' लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला 'आदित्य'; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! पंतप्रधानांनी केली पोस्ट

ISRO Sun Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम इस्रोने यशस्वीपणे पार पाडली आहे. आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजता आदित्य उपग्रहाला एल-1पॉइंटवर प्रस्थापित करण्यात आले.

Sudesh

Aditya L-1 Mission : भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर (Lagrange Point) प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. "अगदी जटिल असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचं कौतुक करत आहे." अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून केली आहे.

"मी सुरक्षितपणे पोहोचलो"

आदित्य यानाने देखील इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचं सांगितलं आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. "एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत" अशा आशयाची पोस्ट इस्रोच्या आदित्य एल-1 या एक्स हँडलवरुन करण्यात आली आहे.

आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत (L1 Halo Orbit) प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल. (India first Solar Mission)

आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.

लॅग्रेंज पॉइंट काय असतात?

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.

एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT