itel launches a27 4g smartphone in india price under 6000 rupees phone with 4000mah battery ai camera  
विज्ञान-तंत्र

भारतात लॉन्च झाला itel A27; किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी

सकाळ डिजिटल टीम

बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये स्मार्टफोन कंपनी itel ने भारतात एक अप्रतिम फोन लॉन्च केला आहे. या फोनला Itel A27 असे नाव देण्यात आले असून Itel च्या या फोनमध्ये AI पॉवर कॅमेरासह 4000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे आहे.

हा फोन सिंगर रॅम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंट 5,999 रुपयांना मिळेल. itel A27 स्मार्टफोन क्रिस्टल ब्लू, सिल्व्हर पर्पल आणि डीप ग्रे या तीन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये येतो.

फोनच्या मागील बाजूस ग्रेडियंट टोन ब्लॅक कलर फिनिश देण्यात आला आहे. itel A27 या स्मार्टफोनची त्याच्या सेगमेंटमध्ये JioPhone Next शी स्पर्धा होणार आहे. JioPhone Next ची किंमत देखील 5,999 रुपये आहे. तसेच, स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, itel A27 स्मार्टफोन JioPhone Next पेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. वाचा सविस्तर..

itel A27 चे स्पेसिफिकेशन्स

Itel A27 स्मार्टफोनमध्ये मोठा 5.45 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले FW + IPS सपोर्ट सह येईल. प्रोसेसर सपोर्ट म्हणून फोनमध्ये ऑक्टाकोर 1.4GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 बेस्ड (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्पेस 128 जीबीपर्यंत वाढवता येते.

itel A27 कॅमेरा

itel A27 स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर सिंगल 5 मेगापिक्सेल AI रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो फ्लॅश सपोर्टसह येईल. सेल्फीसाठी फोनमध्ये 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये एआय ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, एचडीआर मोड, शॉर्ट व्हिडिओ, एआर फिल्टर आणि स्टिकर्स असे विविध प्रकारचे कॅमेरा मोड देण्यात आले आहेत. फोन ड्युअल 4G सिम सपोर्टसह येतो.

itel A27 बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, itel A27 स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. itel A27 च्या खरेदीवर, फोनमध्ये क्रॉस अॅडॉप्टर, USB केबल, स्क्रीन फिल्म, यूजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड सोबत प्रोटेक्टिव्ह कार्ड यांसारख्या अॅक्सेसरीज देण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT