SLIM Moon Lander
SLIM Moon Lander eSakal
विज्ञान-तंत्र

SLIM Moon Lander : जपानच्या मून लँडरची अनोखी कामगिरी, चंद्रावर काढल्या दोन रात्री; ‘स्लिम’ दुसऱ्यांदा जागृत

Sudesh

JAXA SLIM Moon Lander : चंद्रावर १५ दिवसांची दुसरी रात्र निद्रितावस्थेत घालविल्यानंतर जपानचे मानवरहित चांद्रयानाचा लँडर ‘स्लिम’ पुन्हा एकदा जागृत झाले आहे. लँडरने चंद्रावरील नवी छायाचित्रे पृथ्वीवर पाठविली असल्याचे जपानच्या अवकाश संशोधन संस्थेने (जाक्सा) गुरुवारी सांगितले. इस्रोचं चांद्रयान-3 किंवा अमेरिकेचं खासगी मून लँडर देखील चंद्रावर उतरलं होतं. मात्र या दोघांनाही चंद्रावरील रात्रीनंतर जागं होणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे जपानच्या मून लँडरची ही कामगिरी अनोखी मानली जात आहे.

‘‘आम्हाला काल रात्री ‘स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून’ कडून (स्लिम किंवा मून स्नायपर) किंवा प्रतिसाद मिळाला. त्यावरून चंद्रावरील दुसऱ्या रात्रीचा टप्पा लँडर पुन्हा यशस्वीपणे पूर्ण केल्याची खात्री पटली आहे. चंद्रावर काल रात्री सूर्य अवकाशात होता आणि उपकरणेही तापलेली होती. त्यामुळे आम्ही काही काळ अन्य कामांबरोबर नेव्हिगेशन कॅमेऱ्याने सामान्य दृश्‍यांचे चित्रण केले, ’’ असे ‘जाक्सा’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर चंद्रावरील विवराच्या खडकाळ भागाचे कृष्णधवल छायाचित्रही पोस्ट केले आहे. याआधी फेब्रुवारीत स्लिम लँडर जागृत झाले होते. (Japan Moon Sniper)

चंद्रावर कशी असते रात्र?

चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीच्या 15 दिवसांएवढा असतो. त्याचप्रमाणे रात्रही 15 दिवसांची असते. चंद्रावर रात्रीच्या वेळी तापमान अगदी कमी होतं. सुमारे उणे 133 अंश सेल्सिअस तापमानाला बहुतांश इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फ्रीज होऊन जातात. यानंतर जेव्हा चंद्रावर पुन्हा सूर्योदय होतो, तेव्हा ती उपकरणे पुन्हा कार्यरत होणं अगदी अवघड गोष्ट असते. (Moon Night)

इस्रोच्या चांद्रयान-3 (ISRO Chandrayaan 3) मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर देखील चंद्रावरील रात्र सुरू होण्यापूर्वी स्लीप मोडवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर 15 दिवसांनी त्यांना पुन्हा जागं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या दोघांनीही सिग्नलला प्रतिसाद दिला नाही. हे होणार असं इस्रोने गृहित धरलंच होतं. त्यामुळे चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधी चंद्रावरील दिवसाचे दोन आठवडे ठेवण्यात आला होता. त्यामुळे चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली. 15 दिवसांनंतर जर लँडर-रोव्हर जागे झाले असते, तर तो नक्कीच बोनस ठरला असता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT