Which Prepaid Plan is Better: Jio vs Airtel vs Vi
Which Prepaid Plan is Better: Jio vs Airtel vs Vi  
विज्ञान-तंत्र

Jio vs Airtel vs Vi : दररोज 1GB डेटा देणारा कोणाचा प्लॅन आहे स्वस्त?

सकाळ डिजिटल टीम

Jio, Airtel, Vi prepaid Plans : Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही खाजगी कंपन्यांनी त्यांचे प्री-पेड प्लॅन महाग केले आहेत. सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन जवळपास 25 टक्क्यांनी महाग झाले आहेत. आज या महिन्याचा आणि वर्ष 2021 चा शेवटचा दिवस असून या खास प्रसंगी, दररोज 1 GB डेटा ऑफर करणाऱ्या Jio, Vodafone Idea आणि Airtel च्या प्लॅनबद्दल तसेच कोणाचा प्लॅन स्वस्त आहे हे देखील जाणून घेऊया. (Which Prepaid Plan is Better: Jio vs Airtel vs Vi)

जिओचा प्लॅन (Jio Prepaid Plans)

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 20 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 100 मेसेज देखील मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. Jio चा 179 रुपयांचा प्लॅन देखील आहे जो 24 दिवसांसाठी वैध आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 100 SMS सह 1 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल.

Airtel चा प्लॅन (Airtel Prepaid Plans)

Airtel चा 209 रुपयांचा प्री-पेड प्लॅन आहे ज्यामध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह 1 GB डेटा दररोज आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे. एअरटेलचा दुसरा प्लॅन 239 रुपयांचा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 24 दिवसांची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone Idea चा प्लॅन (Vodafone-Idea Prepaid Plans)

Vodafone Idea किंवा Vi चा 199 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये 18 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते. दररोज 1 GB डेटा असलेला दुसरा प्लॅन 219 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस मोफत कॉलिंगसह उपलब्ध आहेत. कंपनीचा 239 रुपयांचा प्लॅन देखील आहे ज्यामध्ये 24 दिवसांची वैधता मिळते आणि दररोज 1 GB डेटा देण्यात येतो. यामध्ये दररोज फ्री कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT