Celebration in Space Sunita Williams Successful Starliner Docking at ISS esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Starliner : सुनीता विल्यम्सची अवकाश झेप यशस्वी; स्पेस डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल,तुम्ही पाहिलात काय?

Starliner Space Dance : यान 10 जूनला पॅराशूट आणि एअरबॅगच्या आधारे अमेरिकेच्या नैऋत्य भागात उतरणार

Saisimran Ghashi

NASA Mission : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था NASAच्या अंतराळ मोहिमेत पुन्हा एका भारतीय-अमेरिकन अंतराळवीराचा सहभाग झाला आहे. सुनीता विल्यम्स यांनी गुरूवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुरक्षितपणे पोहोचल्यावर थोडासा डान्स केला. 59 वर्षीय सुनीता यांच्यासोबत या मोहिमेवर NASAचे अंतराळवीर विल्मोर सहभागी आहेत.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यावर त्यांचे जुन्या ISS परंपरेनुसार घंटा वाजवून स्वागत करण्यात आले. BoeingSpaceने यावेळी सुनीताचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अंतराळ स्थानकावर पोहोचल्यावर आपल्या सहकाऱ्यांना “दुसरे कुटुंब” म्हणून संबोधित करत सुनीता म्हणाल्या, “कामाला सुरुवात करण्याची ही उत्तम पद्धत आहे. इतके सुंदर स्वागत केल्याबद्दल धन्यवाद."

स्टारलाइनर हे अंतरिक्ष यान पृथ्वीच्या कक्षेत मुळी पोहोचू शकणार नाही अशी भीती होती. परंतु अनेक तांत्रिक अडचणी दूर करत शेवटी यशस्वी झाले. फ्लोरिडामधील केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून सुमारे 26 तासांच्या प्रवासानंतर त्यांनी यशस्वीरित्या बोइंगच्या स्टारलाइनर यानाला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी जोडले. स्टारलाइनर उडवणाऱ्या पहिल्या अंतराळवीर म्हणून सुनीता आणि विल्मोर यांनी इतिहास रचला आहे.

58 व्या वर्षी अंतराळातील पहिल्या मानवयुक्त अंतराळयानाच्या उड्डाणात सहभागी होणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून सुनीता विल्यम्स यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही त्यांची अंतराळातील तिसरी मोहीम आहे.

स्टारलाइनर मोहिमेच्या यशस्वीतेवर अवलंबून असेल की, हे यान पुढे अंतराळवीरांना सहा महिन्यांसाठी अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी NASA ने निश्चित केले आहे का? एलॉन मस्कचा स्पेसएक्स आधीच ही सेवा पुरवित आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर विल्मोर आणि सुनीता हे आता Expedition 71 crew चा भाग बनले आहेत. या टीममध्ये NASAचे अंतराळवीर मायकल बॅरेट, मॅट डॉमिनिक, ट्रॅसी सी डायसन, जॅनेट इप्स आणि रॉस्कॉसमॉसचे अंतराळवीर निकोलाई चुब, अलेक्झांडर ग्रेबेनकिन आणि ओलेग कोनोनेंको यांचा समावेश आहे.

सुनीता आणि विल्मोर हे सुमारे एक आठवडा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर राहणार असून त्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतील. NASA च्या माहितीनुसार, हे यान जून 10 रोजी पॅराशूट आणि एअरबॅगच्या आधारे अमेरिकेच्या नैऋत्य भागात उतरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT