Bengaluru Carpooling eSakal
विज्ञान-तंत्र

Bengaluru Carpooling : आता बंगळुरूमध्ये कार-पूलिंग बंद, कर्नाटक सरकारचा निर्णय! कित्येक अ‍ॅप्सना दणका

यामुळे शहरातील ट्रॅफिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sudesh

कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरूमध्ये यापुढे पांढरी नंबर-प्लेट असणाऱ्या गाड्यांमधून प्रवासी वाहतूक किंवा कार-पूलिंग करणं बेकायदेशीर असणार आहे. असं करताना आढळल्यास पाच ते दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बंगळुरू शहरात सध्या ब्लाब्ला कार, क्विक राईड, राईड शेअर, कम्युट ईजी, कारपूल अड्डा असे कित्येक अ‍ॅप कारपूलिंग सुविधा प्रदान करत आहेत. यासाठी ते पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट असणाऱ्या खासगी वाहनांची मदत घेतात. मात्र सरकारच्या निर्णयानंतर आता या अ‍ॅप्सना दणका बसला आहे.

बंगळुरूमधील ट्रॅफिक सर्वांनाच माहिती आहे. यामुळे कित्येक लोक ऑफिसला जाण्यासाठी स्वतःची कार बाहेर काढण्याऐवजी कार-पूलिंगला प्राधान्य देतात. ओला-उबर अशा टॅक्सी किंवा रिक्षा पुरवणाऱ्या अ‍ॅप्सच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे देखील लोक याला प्राधान्य देत होते.

मात्र, यामुळे बंगळुरू टॅक्सी असोसिएशन आणि ऑटोरिक्षा ड्रायव्हर युनियन यांनी आंदोलन केलं होतं. बंगळुरू बंदची घोषणा करत त्यांनी राज्याचे वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामधील मुख्य मागण्या या कारपूलिंग आणि बाईक-टॅक्सी बंद करणे या होत्या.

सरकारने यानंतर कार-पूलिंग बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, बाईक-टॅक्सीबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

शहरातील ट्रॅफिक वाढणार?

बंगळुरू हे देशातील सर्वात मोठं ट्रॅफिक डेन्सिटी असणारं शहर आहे. 11 मिलियन लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये 12.5 मिलियन गाड्या आहेत. म्हणजेच, या शहरात माणसांपेक्षा जास्त वाहनं आहेत. आता कार-पूलिंग बंद झाल्यामुळे कित्येक लोक पुन्हा स्वतःची वाहनं वापरण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरातील ट्रॅफिक आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT