Electric Car: sakal
विज्ञान-तंत्र

Electric Car: इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Electric Car: पण इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यावर सर्व्हिसिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

keep these things in mind while service electric car

आजकाल पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक त्रस्त आहेत. यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक कार वापरण्यावर भर देत आहेत. पण इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यावर सर्व्हिसिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

  • वेळेवर सर्व्हिसिंग करावी

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग नेहमी वेळेवर करावी. यामुळे अनेक महत्वाच्या भाग खराब होत नाही. तसेच वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने गाडीचे आयुष्य वाढते.

  • बॅटरी तपासावी

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिग करताना बॅटरीची काळजी घ्यावी. कारण बॅटरी चांगली आहे की खराब झाली आहे हे समजते. तुम्ही दूरच्या प्रवासात जात असाल तर बॅटरी बदलू शकता. यामुळे प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.

  • कुलेंट चेक करावे

इलेक्ट्रिक कारमध्ये इंजीन नसेल तरी कुलेंटची मदत घेऊन बॅटरीचे तापमान सामान्य ठेवले जाते. यामुळे इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिग करताना कुलेंटसुद्धा चेक करावे. कुलेंट बदलण्याची गरज असेल तर बदलावे. यामुळे कारचे आयुष्य वाढते.

  • या गोष्टी ठेवा लक्षात

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करताना बॅटरी, कुलेंटच नाही तर ब्रेक, टायर या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे. टायर खराब झाले असेल तर बदलावे. यामुळे प्रवास करताना कोणतीही समस्या येणार नाही.

  • हे काम करू नका

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिग करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. इलेक्ट्रिक कार थेट सुर्यप्रकासात ठेऊ नका. यामुळे बॅटरीवर परिणाम होतो. तसेच प्रत्येक वेळी कार फास्ट चार्जिंगऐवजी सामान्य चार्जरने चार्ज करावी. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT