keep your profile and chat secret on whatsapp follow this trick Marathi article 
विज्ञान-तंत्र

WhatsApp वर तुमचा प्रोफाइल फोटो आणि चॅट ठेवा सीक्रेट, या ट्रिक्स करा फॉलो

सकाळ डिजिटल टीम

आजकाल आपण सगळेच जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. एखाद्याशी गप्पा मारण्यासाठी किंवा फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच वापरले जाते. इतकेच नाही तर व्हॉईस कॉलपासून व्हिडिओ कॉलिंगपर्यंत, व्हॉट्सअ‍ॅपने सगळं काही सोपे केले आहे.  व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनेक फीटर्स अपडेट करत राहते. तुम्हाला तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो सिक्रेट ठेवायचा असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर असे फीचर तुम्हाला मिळेल की तुम्ही फोटो आणि चॅटदेखील सिक्रेट करू शकाल. असे बरेच लोक आहेत ज्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मूलभूत बेसीक फीचर्स सोडून इतर सिक्रेट फीचर्स माहितच नाहीत. आज आज आपण व्हॉट्सअॅपचे सीक्रेट फीचर्स बोलत जाणून घेणार आहोत.

 1.  प्रोफाइल फोटो हाइड करणे -

बर्‍याच लोकांना आपला प्रोफाइल फोटो कोणालाही दाखवायचा नसतो, त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला एक खास फीचर देते की आपण आपला फोटो इतरांपासून लपवू शकता किंवा एखाद्य व्यक्तीसाठी व्हाट्सएप प्रोफाइल फोटो ठेवू शकता. यासाठी आपण अकाऊंट सेटिंग्जवर जा आणि प्रयव्हसी ऑप्शन उघडा. आता प्रोफाइल फोटो ऑप्शनवर जा आणि Nobody वर क्लिक करा. असे केल्यावर, आपला प्रोफाइल फोटो आपल्या संपर्कातील लोकांना दिसणार नाही.

2. रीसेंट इमोजी कसे काढावे-

जेव्हा आपण एखाद्याशी वैयक्तिक चॅट करता आणि जेव्हा ती डिलीट  करता,  त्यानंतरही आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  कारण आपल्या चॅटमध्ये वापरलेला इमोजी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवरील रीसेंट इमोजीमध्ये तशाच राहतात. सर्वाधिक वापरलेले इमोजी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप इमोजीमध्ये सर्वात आधी दिसतात. आपण त्यांना काढून टाकायच्या असल्यास आपण कोणत्याही चॅटवर जा आणि  इमोजी निवडा. यानंतर त्यांना चॅटबॉक्समधून डिलीटकरा. यामुळे तुमच्या जून्या इमोजी निघून जातील आणि नव्या इमोजी सलेक्ट होतील.

3. ग्रुप अ‍ॅडमिन कसा बदलायचा-

जर तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला हटवू शकता. तुमची इच्छा असल्यास, अशा व्यक्तीस ग्रूपमधून काढू शकता. हे करण्यासाठी, आपल्याला ग्रुप इन्फो ऑप्शनवर जावे लागेल आणि त्या व्यक्तीचे नाव थोडावेळ प्रेस  करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिमूव्ह एज अ‍ॅडमिन हा ऑप्शन दिसेल तो प्रेस  करुन तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपमधून काढू शकता.

4. सर्वाधिक चॅट्स -

व्हॉट्सअ‍ॅपवर आपण कोणाबरोबर सर्वाधिक चॅट करता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सेटिंग्जमध्ये जाऊन डेटावर क्लिक करावे लागेल. येथे आपल्याला स्टोरेज यूसेज वर क्लिक करावे लागेल. येथे आपण सर्व संपर्क आणि ग्रुपची रँकिंग दिसेल ज्यामध्ये आपल्याला सर्वाधिक चॅट, शेयर केलेल्या मिडिया फाइल्स ही सगळी माहिती मिळून जाईल.

5 - व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स -

तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यातून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पैसे पाठवायचे असतील किंवा बँक खात्यात व्हॉट्सअ‍ॅपशी लिंक करायचा असेल तर व्हॉट्सअ‍ॅप आयसीआयसीआय, एसबीआय आणि एचडीएफसी बँकांव्यतिरिक्त अनेक बँकांकडील पेमेंटला सपोर्ट देते. तुम्ही आपले बँक खाते व्हॉट्सअ‍ॅपवर जोडू शकता,  परंतु यामध्ये तुम्हाला फसवणूकीपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT