Kia Carens Clavis Car Details : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये किया मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय एमपीव्ही (मल्टी परपज व्हेईकल) मालिकेत एक नवा दमदार पर्याय सादर केला आहे. किया कॅरेन्स क्लॅव्हिस (Kia Carens Clavis) ही नवीन कार ११.५० लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही गाडी आधीपासूनच ९ मेपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि डीलरशिप्सवर बुकिंगसाठी खुली करण्यात आली आहे.
कॅरेन्स क्लॅव्हिस हे मॉडेल पूर्णतः नव्या रूपात सादर करण्यात आलं असून यामध्ये त्रिकोणी आकाराच्या हेडलाइट्स, व्ही-शेप डीआरएल्स (LED DRLs), ब्लॅक ग्रिल आणि स्लीक सिल्वर स्किड प्लेट्ससह रग्ड लुक देण्यात आला आहे. १७ इंचांच्या ड्युअल-टोन अलॉय व्हिल्स, क्रोम डोअर हँडल्स आणि सिल्वर रूफ रेल्ससह ही गाडी अधिक आकर्षक दिसते. मागील भागात एलईडी लाइट स्ट्रिपसह नवा टच देण्यात आला आहे.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस तीन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे
१.५ लिटर टर्बो पेट्रोल – १५७ एचपी व २५३ एनएम टॉर्क
१.५ लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल – ११३ एचपी व १४३.८ एनएम टॉर्क
१.५ लिटर डिझेल – ११३ एचपी व २५० एनएम टॉर्क
कॅरेन्स क्लॅव्हिसच्या केबिनमध्ये २२.६२ इंचांचा ड्युअल-स्क्रीन सेटअप आहे, ज्यामध्ये १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे. यामध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल पेन पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, बोसचे 8 स्पीकर साउंड सिस्टम, चार-वे पॉवर अॅडजस्टेबल सीट्स आणि स्मार्ट एसी कंट्रोल्सही दिले आहेत.
सुरक्षेच्या बाबतीत कॅरेन्स क्लॅव्हिस हे मॉडेल कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही. यात ADAS Level 2 तंत्रज्ञान दिलं आहे, जे २० स्वयंचलित सुरक्षा फंक्शन्ससह येतं. याशिवाय, ६ एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा, फ्रंट व रिअर पार्किंग सेन्सर्स, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ब्लाइंड स्पॉट वॉर्निंगसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस सात व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे
HTE, HTE (O), HTK, HTK (+), HTK + (O), HTX, HTX +
या कारची किंमत ११.५० लाख पासून सुरू होऊन १८ लाख पर्यंत जाते (एक्स-शोरूम).
किया कॅरेन्स क्लॅव्हिस ही गाडी स्टाईल, परफॉर्मन्स आणि सुरक्षा यांचं परिपूर्ण मिश्रण आहे. भारतीय कुटुंबांसाठी ही एक परिपूर्ण प्रीमियम MPV ठरू शकते. नव्या युगातील ड्रायव्हिंग अनुभवासाठी ही एक जबरदस्त निवड असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.