Reels Addiction in Kids eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Addiction in Kids : रील्स बघून जपानी अन् चिनी भाषेत बोलू लागलं चार वर्षांचं मूल.. आई-वडिलांनाही कळेना काय प्रकार!

Screen-time Kids : या मुलाची मातृभाषा तर हिंदी आहे, मात्र मूल रील्स प्रमाणे वेगळ्याच भाषेत बोलत आहे. जबलपूरमधून हा प्रकार समोर आला आहे.

Sudesh

Mobile Addiction and Autism in Kids : आजकाल प्रत्येक घरामध्ये किमान दोन स्मार्टफोन दिसतातच. घरातील लहान मुलांनी शांत बसावं, गोंधळ घालू नये किंवा जेवण करावं अशा विविध कारणांसाठी त्यांच्या हातात देखील मोबाईल दिला जातो. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर स्क्रोल करत ही मुलं मग कित्येक तास रील्स (Reels) आणि शॉर्ट्स (Shorts) बघत बसतात. याचा गंभीर दुष्परिणाम एका चिमुरड्यावर झाल्याचं समोर आलं आहे.

एका दीड वर्षांच्या मुलाचं संगोपन करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी महिलेला कामावर ठेवलं होतं. हे मूल रडू लागताच त्याला शांत करण्यासाठी ही महिला त्याच्या हातात मोबाईल देत होती. यामुळे दिवसाचे सहा ते सात तास हे मूल मोबाईल पाहत असायचं. आता हे मूल चार वर्षांचं झालं आहे, पण ते चक्क रील्समधील व्यक्तींप्रमाणे चिनी-जपानी भाषेत बोलत असल्याचं पालकांनी सांगितलं. जबलपूरमधून हा प्रकार समोर आला आहे. (Kids Reels Addiction)

या मुलाची मातृभाषा तर हिंदी आहे, घरी आई-वडिलांनाही हिंदीच भाषा येते. मात्र, मूल रील्स प्रमाणे वेगळ्याच भाषेत बोलत असल्यामुळे आई-वडिलांना त्याला काय म्हणायचं आहे हेच कळत नाहीये. 'पत्रिका'ने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलावर आता मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाईलमुळे वाढतोय ऑटिजमचा धोका

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओ.पी. रायचंदानी यांनी सांगितलं, की मोबाईल-टीव्हीसमोरचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे सात वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये ऑटिजम (Autism) आजाराचा धोका वाढतो आहे. अशा मुलांमध्ये मातृभाषेचा विकास होत नसल्याचं दिसत आहे. स्क्रीनवर दिसणारी, ऐकू येणारी भाषाच ते बोलत आहेत. अशी कित्येक प्रकरणे समोर आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

स्क्रीन टाईम करा कमी

असा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचा स्क्रीनटाईम मोठ्या प्रमाणात कमी करण्याची गरज आहे. मुलांच्या हातात मोबाईल देणे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत खेळणे, त्यांना (आपल्या भाषेत) गोष्टी ऐकवणे, गाणी ऐकवणे अशा गोष्टी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. (Kids Screen-time)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT