know how to check Gmail security and login details Marathi Article 
विज्ञान-तंत्र

Gmail किती डिव्हाइसवर लॉग इन आहे, चेक करा 'या' सोप्या पध्दतीने

सकाळ डिजिटल टीम

जीमेल आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी बँक संबंधित कामे आणि इतर बऱ्याच महत्वाच्या ठिकाणी वापरल्या जातात. काही बँका फोनसोबतच जीमेल आयडीवर देखील ओटीपी पाठवतात. या व्यतिरिक्त आपल्या खात्याच्या माहितीमध्ये अन्य बदल करण्यासाठी जीमेल आवश्यक असतो. परंतु जर त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड जर का दुसर्‍या कोणाच्या हाती लागला तर ते खूप धोकादायक ठरु शकते. 

जीमेल अकाउंट बर्‍याच वेळा आपण चुकून एकापेक्षा जास्त ठिकाणीही लॉगिन करतो.  तिथून लॉगआउट केले की नाही हे आपल्या लक्षात राहात नाही, आज आपण किती डिव्हाइसमध्ये लॉग इन केलेले आहे ते तुम्ही कसे तपासू शकता ते सविस्तर जाणून घेणार आहोत.

जीमेल सुरक्षा कशी तपासायची 

आपले खाते किती ठिकाणी लॉग इन झाले आहे हे तपासण्यासाठी प्रथम आपल्या जीमेल खात्यात लॉग इन करा. यानंतर, सर्व मेलच्या खाली जा आणि तेथे तळाशी उजव्या बाजूला दिलेल्या डिटेल्स वर क्लिक करा. यानंतर एक पॉप विंडो उघडेल, ज्यामध्ये आपण पाहू शकता की आपले खाते किती  IP अड्रेस, लोकेशन आणि लॉग इन केलेली वेळ हे देखील पाहाता येईल. 

 पॉप अप विंडोमध्ये Security Chechup

या नंतर, पॉप अप विंडोमध्ये आपल्याला वरच्या बाजूला Security Checkup दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर, एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये वर दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा आणि पुन्हा आपला जीमेल आयडी आणि पासवर्ड टाका. आता आपण जिमेल आयडी कुठे वापरली आहे ते पहा, यात काही शंका असल्यास आपण तेथून हटवून आपला नवीन पासवर्ड सेट करू शकता. 

जीमेल पासवर्ड स्ट्रॉंग कसा बनवायचा 

लोक बर्‍याचदा जीमेलवर कमकुवत पासवर्ड ठेवतात जेणेकरुन तो सहज लक्षात राहील , परंतु हे देखील धोकादायक सिद्ध होऊ शकते. आपण नेहमीच एक मजबूत पासवर्ड ठेवला पाहिजे, ज्यात स्पेशल कॅरेक्टर, काही संख्या आणि स्मॉल आणि कॅपिटर कॅरेक्टर्स वापरले पाहीजेत  आहेत. स्वतःचेच नाव किंवा जन्मतारीख पासवर्ड ठेवणे धोकादायक आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: ३० हजारांऐवजी १५ लाख रुपये मिळणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, ७३ प्रस्ताव सादर...

Khidrapur Kopeshwar Temple : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अवतरणार ‘सुपरमून’; स्वर्ग मंडपात मध्यरात्री रंगणार खगोलीय चमत्कार!

Ambaghat Tunnel Project: आंबाघाटात सात किलोमीटरचा बोगदा; अडीच हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव; तीन पर्यायी ‘अलाइनमेंट’ सादर

Kolhapur News: ‘गोकुळ’च्या सुनावणीसाठी ८० लाख रुपयांचे मानधन; शासनाचे आदेश,ॲड. मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

SCROLL FOR NEXT