Smartphone Data Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips: फोनमधील महत्त्वाचे फोटो-व्हीडिओ डिलीट झालेत? या सोप्या टिप्सने सहज करा डेटा रिकव्हर

अनेकदा स्मार्टफोनमधील महत्त्वाचे फोटो आणि व्हीडिओ डिलीट होत असतात. परंतु, तुम्ही सोप्या टिप्सच्या मदतीने डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा मिळवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Recover Deleted Smartphone Data: स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळी कामं करत असतो. फोनमध्येच खासगी फोटो, व्हीडिओ आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स स्टोर करून ठेवतो. परंतु, फोन खराब झाल्यास हा डेटा रिकिव्हर करणे खूपच अडचणीचे ठरते. आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज डिव्हाइसमधील डेटा रिकव्हर करू शकता. डेटा रिकव्हर करण्याच्या या सोप्या पद्धतीविषयी जाणून घेऊया.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

क्लाउड बॅकअपवरून करा रिकव्हर

जर तुम्ही गुगल बॅकअप अथवा इतर क्लाउड बॅकअपचा पर्याय सुरू ठेवला असल्यास डेटा रिकव्हर करणे खूपच सोपे आहे. यासाठी तुम्हाला गुगल आयडी अथवा क्लाउड आयडीने लॉग इन करावे लागेल. अ‍ॅपल डिव्हाइस असल्यास iCloud वर डेटा स्टोर होतो.

हा डेटा रिकव्हर करण्यासाठी अ‍ॅपल आयडीचा वापर करावा लागेल. याद्वारे आपोआप लास्ट बॅकअप डेटा तुमच्या नवीन डिव्हाइसवर रिकव्हर होईल. तुम्ही या क्लाउड वेबसाइटच्या मदतीने जुन्या डिव्हाइसमधील डेटा देखील डाउनलोड करू शकता.

थर्ड पार्टी रिकव्हरी साइट्सची घ्या मदत

तुम्हाला असे अनेक अ‍ॅप्स आणि साइट्स मिळतील, ज्याच्या मदतीने डिलीट झालेला डेटा सहज रिकव्हर करू शकता. यासाठी तुम्ही Fonepaw रिकव्हरी टूलचा देखील वापर करू शकता. डेटा साइज कमी असल्यास फ्री मध्ये डेटा डाउनलोड होईल. जास्त डेटा असल्यास पैसे लागतील.

माइक्रो-एसडी कार्डचा डेटा देखील होईल रिकव्हर

स्मार्टफोनमध्ये जास्त स्टोरेज उपलब्ध असल्याने मायक्रो-एसडी कार्डचा वापर कमी झाला आहे. परंतु, तुमच्याकडे मायक्रो-एसडी कार्ड असल्यास त्यातील डेटा देखील रिकव्हर करू शकता. यासाठी तुम्हाला रिकव्हरी टूलची मदत घ्यावी लागेल. एडॉप्टरच्या मदतीने मायक्रो-एसडी कार्डला कॉम्प्युटरशी कनेक्ट करा. आता रिकव्हरी टूल वापरून डेटा रिकव्हर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT