Twitter Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter वरील फॉलोअर्स अचानक कमी झालेत? हे असू शकतं कारण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तुमच्याही ट्विटरवरील (Twitter) फॉलोअर्स अचानक कमी झालेत का? पण, फॉलोअर्स कमी होणारे तुम्ही एकटे नाहीत. अनेकांचे ट्विटरवरील फॉलोअर्स गुरुवारी रात्री अचानक कमी झाले आहेत. फॉलोअर्स हजारपासून शंभरापर्यंत आल्याच्या तक्रारी देखील अनेकांनी केल्या आहेत. मात्र, अद्याप ट्विटरने याबाबत खुलासा केलेला नाही.

सध्या सोशल मीडियावर फेक अकाऊंटची संख्या वाढली आहे आणि तेच या कंपन्यांसाठी डोकेदुखी देखील बनली आहे. त्यामुळे ट्विटरसारखे मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे अकाऊंट शोधणे आणि ते डिलिट करण्यासाठी एक मोहीम राबवत असतात. कदाचित त्यामुळेच अनेकांचे फॉलोअर्स कमी झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. फोन नंबर आणि पासवर्ड यारसाख्या तपशीलाची पुन्हा खात्री करण्यास ट्विटर विचारते. जोपर्यंत या तपशीलाची संबंधित अकाऊंवरून पुष्टी केली जात नाही तोपर्यंत ट्विटर त्या अकाऊंटचा फॉलोअर्समध्ये समावेश करत नाही. ट्विटरवरून होणारी फसवणूक, काही गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

गेल्या जून महिन्यात देखील ट्विटरने असाच एक प्रयोग केला होता. त्यावेळी अभिनेता अनुपम खेरने ३६ तासांत ८० हजार ट्विटर फॉलोअर्स गमावल्याचे ट्विट केले होते. त्यावेळी ट्विटरने सांगितले होते की, ''तुम्हाला वेळोवेळी फॉलोअर्सची संख्या कमी झालेली दिसेल. कारण आम्ही अनेक अकाऊंटला पासवर्ड आणि फोन नंबरची खात्री करण्यास सांगतो. जोपर्यंत या माहितीची पुष्टी होत नाही तोपर्यंत त्यांचा फॉलोअर्समध्ये समावेश करत नाही. ट्विरवरील घोटाळे टाळण्यासाठी आणि सर्व ट्विटर अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही हे करत असतो.

दरम्यान, अनेक सोशल मीडिया युजर्सने यावर मीम्स देखील बनवले आहेत. यावरून सोशल मीडियावर सध्या मीम्सचा पाऊस पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT