Maruti Dzire
Maruti Dzire esakal
विज्ञान-तंत्र

Maruti Dzire बनली देशातील नंबर 1 सेडान, Tata अन् Hyundaiला ही टाकलं मागे, किंमतही स्वस्त

सकाळ ऑनलाईन टीम

Maruti Dzire : मारुती सुझुकीने सेडान विभागात आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे आणि सर्वाधिक विक्री होणारी सेडान म्हणून तिची ओळख बाजारात निर्माण केली आहे. डिसेंबर 2022 चा कार विक्री अहवाल पाहता, मारुती सुझुकी डिझायरने त्याच्या सेगमेंटमध्ये Hyundai Aura, Tata Tigor आणि Honda Amaze यासह इतर लोकप्रिय सेडानला मागे टाकले आहे.

उत्कृष्ट लुक आणि नवीनतम वैशिष्ट्यांसह, मारुती डिझायर चांगल्या मायलेजसह पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ती लोकांमध्ये लोकप्रिय बनली आहे. तुम्हीही स्वत:साठी सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी येथे पाहा कोणत्या कंपनीच्या कोणत्या सेडान कार लोकांकडून पसंत केल्या जात आहेत.

मार्केटमध्ये डिझायरचा बोलबाला

डिसेंबर 2022 च्या सेडान कार विक्री अहवालावर नजर टाकल्यास, मारुती सुझुकी डिझायरने एकूण 11,997 युनिट्सची विक्री केली, जी सुमारे 13 टक्के वार्षिक वाढ आहे. सेडान कार विभागात डिझायरचा बाजारातील हिस्सा 35 टक्क्यांहून अधिक आहे.

डिझायरने टाटा आणि ह्युंदाईलाही सोडलं मागे

मागील महिन्यात एकूण ४१५६ युनिट्सची विक्री होऊन Hyundai Aura ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी सेडान होती. Aura च्या विक्रीत वार्षिक 142 टक्के वाढ झाली आहे. तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा टिगोर आहे, ज्याने गेल्या डिसेंबरमध्ये 3669 कार विकल्या. Honda Amaze चौथ्या क्रमांकावर असून गेल्या महिन्यात तिचे एकूण 3614 युनिट्स विकले गेले.

होंडा सिटीने गेल्या महिन्यात 3086 मोटारींची विक्री केली आहे. तर, स्कोडा स्लाव्हियाने गेल्या डिसेंबरमध्ये 2257 मोटारींची विक्री केली. त्यापाठोपाठ फोक्सवॅगन व्हरटसचा क्रमांक लागतो, ज्याने एकूण 1888 युनिट्स विकल्या. (Automobile)

मारुती सुझुकी डिझायरची किंमत

मारुती सुझुकी डिझायर सेडानचे एकूण 9 प्रकार भारतीय बाजारपेठेत विकले जातात आणि त्यांची एक्स-शोरूम किंमत 6.24 लाख ते 9.18 लाख रुपये आहे. डिझायर पेट्रोलचे मायलेज 24.12 kmpl पर्यंत आहे आणि Dzire CNG चे मायलेज 31.12 km/kg पर्यंत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT