Mark Zuckerberg Tweet eSakal
विज्ञान-तंत्र

Mark Zuckerberg Tweet : तब्बल ११ वर्षांनी मार्क झुकरबर्गने केलं ट्विट! मीम पोस्ट करून इलॉन मस्कला डिवचलं

हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sudesh

मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी केलेलं एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे, तब्बल ११ वर्षांनंतर मार्कने ट्विटरवर पुनरागमन केलं आहे. झुकरबर्गने एक मीम टेम्प्लेट पोस्ट करुन थेट ट्विटरचे मालक इलॉन मस्कला डिवचलं आहे.

बुधवारी इन्स्टाग्रामने आपलं थ्रेड्स नावाचं नवीन अ‍ॅप लाँच केलं. या अ‍ॅपवर यूजर्स अगदी ट्विटरप्रमाणेच कमी शब्दांमध्ये पोस्ट करू शकणार आहेत. त्यामुळे थ्रेड्स हे अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर काही वेळातच मार्क यांनी एक मीम ट्विट केला.

मार्कचं ट्विट

२०१२ नंतर मार्क यांचं हे पहिलंच ट्विट आहे. यामध्ये त्यांनी दोन स्पायडरमॅन एकमेकांकडे पाहत असल्याचा मीम पोस्ट केला आहे. दोन गोष्टींमधील एकसारखेपणा दाखवण्यासाठी या मीम टेम्प्लेटचा वापर होतो. मस्क यांनी या मीमवर काहीही कॅप्शन दिलं नाहीये. तरीही, यातून ट्विटर आणि थ्रेड्स अशा दोन अ‍ॅप्सबद्दल इशारा देण्यात आल्याचं कळत आहे.

थ्रेड्समुळे ट्विटरला फटका

इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटरच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कामगारांचे लेऑफ, जाहिरातदारांची पीछेहाट आणि यूजर्सवर लागू होणारे निर्बंध यामुळे कित्येक लोक ट्विटरला चांगला पर्याय शोधत आहेत.

अशातच मार्क झुकेरबर्गच्या इन्स्टाग्रामने थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच करून लोकांना एक वेगळा पर्याय दिला आहे. त्यामुळे ट्विटरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

थ्रेड्स हे अ‍ॅप १००हून अधिक देशांमध्ये लाँच झालं आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. इन्स्टाग्राम यूजर्स आपल्या सेम लॉग-इन क्रेडेंशिअल्सच्या मदतीने थ्रेड्स अ‍ॅप वापरू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT