Personal Data Sharing Meta
Personal Data Sharing Meta eSakal
विज्ञान-तंत्र

Personal Data : मेटा, लिंक्डइन, गुगल... तुमचा पर्सनल डेटा शेअर करतायत या कंपन्यांचे अ‍ॅप्स! हादरवणारी आकडेवारी समोर

Sudesh

एखाद्या अ‍ॅपवर असणारा तुमचा पर्सनल डेटा हा सुरक्षित आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर थोडं थांबा. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब, लिंक्ड इन आणि चक्क उबर इट्स असे अ‍ॅप्स देखील तुमचा पर्सनल डेटा दुसऱ्यांसोबत शेअर करत असतात. यामध्ये सर्वात पुढे मेटा कंपनीचे अ‍ॅप्स असल्याची माहिती एका रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

दि मनी माँगर्स नावाच्या कंपनीने हा डेटा शेअर केला आहे. मेटा कंपनीचे फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेड्स आणि मेसेंजर हे सर्व अ‍ॅप्स आपल्या यूजर्सचा 86 टक्के डेटा शेअर करतात असं या डेटामध्ये समोर आलं आहे. कोणतं अ‍ॅप किती डेटा शेअर करतं याची एक संपूर्ण यादीच मनी माँगर्सने प्रसिद्ध केली आहे.

यादीमध्ये कोणकोणते अ‍ॅप्स?

या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर लिंक्डइनचा समावेश आहे. हे अ‍ॅप यूजर्सचा 65% डेटा शेअर करते. त्यानंतर उबर इट्स (54%) आणि डोअर डॅशचा (50%) समावेश आहे. इलॉन मस्कचे एक्स अ‍ॅपही 50% डेटा शेअर करते.

गुगलचं यूट्यूब आणि यूट्यूब हे अ‍ॅप्स यूजर्सचा 47% डेटा शेअर करतात. ड्राफ्टकिंग्स स्पोर्ट्सबुक आणि कॅसिनो हे अ‍ॅपही यूजर्सचा 47 टक्के डेटा शेअर करते. गुगल, यूट्यूब टीव्ही आणि एनएफएल हे अ‍ॅप्स आपल्या यूजर्सचा 43 टक्के डेटा थर्ड पार्टीला शेअर करतात. (Tech News)

The Money Mongers List

धक्कादायक माहिती समोर

या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की प्रत्येक दहा अ‍ॅप्समागे 7 अ‍ॅप्स आपल्या यूजर्सचा डेटा शेअर करतात. यातील बहुतांश अ‍ॅप्स निम्मा डेटा थर्ड पार्टीला शेअर करतात, तर सुमारे 70 टक्के डेटा आपल्या फायद्यासाठी ठेवऊन घेतात. सध्या उपलब्ध अ‍ॅप्सपैकी सुमारे 64% अ‍ॅप्स असे आहेत, जे आपल्या यूजर्सचा फोन नंबर आणि इतर पर्सनल डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT