Car Offers Diwali MG eSakal
विज्ञान-तंत्र

Car Offers : अजूनही गेली नाही कार घेण्याची संधी; 'ही' मोठी कंपनी देतेय 2 लाखांपर्यंतची सूट! काय आहेत ऑफर्स?

MG Car Offers : एमजी मोटर्स नोव्हेंबरचा संपूर्ण महिना आपल्या कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहेत.

Sudesh

साधारणपणे दिवाळीच्या काळात कित्येक कार कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑफर्स देत असतात. मात्र, दिवाळीचे चार दिवस झाले की या ऑफर्स संपतात. एमजी मोटर्स मात्र नोव्हेंबरचा संपूर्ण महिना आपल्या कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहेत. सुमारे दोन लाख रुपयांपर्यंतची सूट कंपनी ऑफर करत आहे.

एमजी एस्टर, झेडएस ईव्ही, हेक्टर, ग्लॉस्टर, कॉमेट ईव्ही आणि इतर कार्सवर देखील कंपनी मोठ्या ऑफर्स देत आहे. त्यामुळे या दिवाळीला अजूनही तुमच्याकडे नवीन कार घेण्याची संधी उपलब्ध आहे.

हेक्टर अन् ग्लॉस्टरवर ऑफर्स

MG Gloster या एसयूव्ही कारच्या सर्व व्हेरियंटवर 1.35 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. यामध्ये 50,000 रुपये कंझ्युमर ऑफर, 50,000 रुपये एक्सचेंज बोनस, 20,000 रुपये लॉयल्टी बोनस आणि 15,000 रुपये कॉर्परेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.

MG Hector आणि Hector+ या गाड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. लॉयल्टी बोनस, एक्सचेंज बोनस, कॉर्परेट डिस्काउंट आणि कंझ्युमर डिस्काउंट मिळून एक लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ऑफर्स या कार्सवर लागू होतात.

MG Astor या कारवर 2.10 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स उपलब्ध आहेत. यामध्ये केवळ कंझ्युमर ऑफर्सच 1.25 लाख रुपयांच्या आहेत. याव्यतिरिक्त एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस, कॉर्परेट डिस्काउंट अशा ऑफर्सही आहेत. (Automobile News)

ईव्हींवर डिस्काउंट

MG ZS EV आणि MG Comet EV या दोन इलेक्ट्रिक कार्सवर देखील डिस्काउंट उपलब्ध आहेत. या दोन्ही कारवर सर्व बोनस आणि ऑफर्स लागू केल्यानंतर सुमारे 1,00,000 रुपयांचा फायदा होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT