Broadcasting Services Regulation Bill 
विज्ञान-तंत्र

Broadcasting Bill: माहिती आणि प्रशासन मंत्रालयाचा मोठा निर्णय! वादग्रस्त ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस विधेयकाचा मसुदा घेतला मागे

Broadcasting Services Regulation Bill: माहिती आणि प्रशासन मंत्रालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाकडून वादग्रस्त ठरत असलेल्या ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (रेग्युलेशन) विधेयकाचा मसुदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- माहिती आणि प्रशासन मंत्रालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाकडून वादग्रस्त ठरत असलेल्या ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (रेग्युलेशन) विधेयकाचा मसुदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर विधेयकावर विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर केंद्राकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

केंद्र सरकार नवे ब्रॉडकास्टिंग विधेयक आणू पाहात आहे. त्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता. पण, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. संबंधित क्षेत्राकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने या विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सूचना आणि सल्ले मागवले आहेत.

केंद्र सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ( रेग्युलेशन) २०२३ विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला होता. ब्रॉडकास्टिंग क्षेत्राबाबत कायदे लागू करणे, याशिवाय ओटीटीवरील कंटेन्ट, डिजिटल मिडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मना कायद्याच्या कक्षेत आणणं यासाठी या विधेयक आणले जाणार आहे. याचा दुसरा मसूदा याच वर्षी जुले महिन्यात ठरवण्यात आला होता.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या सत्रामध्ये हे विधेयक समोर ठेवले होते. पण, मीडिया क्षेत्राशी संबंधित संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. डिजिटल प्लॅटफॉर्मला आणि त्यावरील कंटेन्टला सेंसर करण्याचे आणि नियंत्रण करण्याचा हा डाव आहे. यासाठी कायदे आणल्याने कलेची मुस्काटदाबी होईल, असं संघटनांचे म्हणणे होते. विरोधकांनी देखील यावर आवाज उठवला होता. याता पुन्हा एकदा सरकार मसुदा तयार करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT