Sim card Sakal
विज्ञान-तंत्र

7 जानेवारीआधी हे काम करा, अन्यथा सिम कार्ड होईल ब्लॉक

सकाळ डिजिटल टीम

Mobile SIM Card Rule : आधुनिकतेच्या या युगात लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत आहेत, ज्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या. त्याचबरोबर अनेकजण या सुविधांचा गैरवापरही करतात. एवढेच नाही तर हे लोक आपल्या गुन्ह्याचा खापर दुसऱ्याच्या माथ्यावर टाकतात. अशा बाबी लक्षात घेऊन दूरसंचार विभागाने गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी नवा आदेश जारी केला होता.

या आदेशानुसार, नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या वापरकर्त्यांना सिमकार्ड व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमच्याकडेही नऊ पेक्षा जास्त सिमकार्ड असतील, तर तुम्ही 7 जानेवारीपूर्वी त्याची व्हेरिफिकेशन करून घ्यावी, असे न केल्यास तुमचे सिम कार्ड रद्द केले जाईल. हा नियम गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये 30 दिवसांचा कालावधी देऊन 6 जानेवारी हा शेवटचा दिवस ठेवण्यात आला होता.

तुमच्या नावावर जर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड रजिस्टर्ड असतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या सिमचे व्हेरिफिकेशन करून घ्या. तुम्ही 7 जानेवारीपूर्वी हे न केल्यास, तुमची आउटगोइंग सेवा बंद केली जाईल. त्याचबरोबर 45 दिवसांत इनकमिंग कॉल सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिमचे व्हेरिफिकेशन न झाल्यास 60 दिवसांत सिमकार्ड सुविधा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय रोमिंग, आजारी आणि अपंग व्यक्तींनाही या कामासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.जर तुम्ही सिम कार्डचा वापर करीत नसाल तर सिम सरेंडरचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे.

याशिवाय, तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की जर मोबाइल नंबरवर कोणत्याही बँक, लॉ इंफोर्समेंट किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेने तक्रार दिली तर वापरकर्त्याच्या सिमकार्डवर 5 दिवसांच्या आत आउटगोइंग कॉल बंद केला जाईल. याशिवाय 10 दिवसांत इनकमिंग कॉल सेवाही बंद होणार आहे. म्हणजे 15 दिवसात सिम कार्ड पूर्णपणे बंद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरचा विधानपरिषदेचा आमदार भाजपचाच! ५५५ पैकी ३१३ मतदार भाजपचे; शिवसेनेचे ६६ तर राष्ट्रवादीकडे अवघे २७ मतदार, ‘या’ ६ नेत्यांपैकी एकाला उमेदवारी, वाचा...

Healthy and Tasty Breakfast Smoothie: सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; फक्त 3 पदार्थांत तयार करा हेल्दी आणि टेस्टी स्मूदी

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

SCROLL FOR NEXT