Monsoon Car Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Monsoon Car Tips : पावसाळ्यात गाडी चालवताना येऊ शकतात कित्येक अडचणी; गाडीत बसण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा

पावसाळ्यात गाडी चालवताना समोर विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.

Sudesh

तुमच्याकडे जर गाडी असेल, तर तिची निगा राखणं तुमची जबाबदारीच आहे. तसंच, जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यासाठी बाहेर पडाल, तेव्हा त्यापूर्वी गाडीची तपासणी करणं देखील गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यात गाडी चालवताना समोर विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमची गाडी त्या अडचणींना तोंड देण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे.

पावसाळ्यात गाडी चालवताना ओला रस्ता, कमी व्हिजिबिलिटी अशा अडचणी समोर येतात. तुमची गाडी जर अशा अडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज असेल, तर तुमचा प्रवास अगदी आरामदायक आणि सुरक्षित होतो. याबाबतच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

टायर मेन्टेनन्स

पावसाळ्यात निसरड्या रस्त्यांमुळे टायर स्लिप होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी तुमच्या गाडीचे टायर तपासून घेणं गरजेचं आहे. गरज भासल्यास टायर बदलून घेणंही फायद्याचं ठरेल.

विंडशील्ड वायपर

तुमच्या गाडीच्या समोरची काच जर वायपर वापरून देखील स्वच्छ होत नसेल, तर अशा वेळी अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच त्याचे रबर बदलून घेणं गरजेचं आहे.

लाईट्स

पाऊस सुरू असताना तुम्हाला कदाचित समोरचं दिसत असेल, मात्र समोरून येणाऱ्या गाडीमधील व्यक्तीबाबत याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तुमच्या गाडीची लाईट सुरू ठेवणं गरजेचं असतं. पावसाचं पाणी लाईटच्या हाऊसिंगमध्ये जाऊन लाईट खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ब्रेक लाईट, हेडलाईट, टेल लाईट, टर्न इंडिटेकर अशा सर्व लाईट्स तपासून घेणं गरजेचं आहे.

ब्रेक

पावसात गाडी चालवताना जर तुमचे ब्रेक आवाज करत असतील, किंवा ब्रेक पॅडल अधिक टाईट किंवा लूज असेल; तर लवकरच ते तपासून घेणं गरजेचं आहे.

बॅटरी

पावसाचं पाणी बॅटरीत जाऊन ती खराब होण्याची शक्यता असते. शिवाय, बॅटरीला असलेल्या वायर लूज होण्याचाही धोका असतो. त्यामुळे, पावसात गाडी बाहेर काढण्यापूर्वी बॅटरी तपासून घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT