Insurance
Insurance sakal
विज्ञान-तंत्र

लवकरच वाढणार सर्व गाड्यांचा इंश्युरंस; इंजिननुसार होणार वसूली

सकाळ डिजिटल टीम

कार सह अन्य वाहन चालकांचे आता खर्च वाढणार आहे. 1 जून 2022 पासून तुमच्या कारचा इंश्‍योरेंस खर्च वाढणार आहे. केंद्र सरकार ने बुधवारी थर्ड पार्टी मोटर वेहीकल इंश्युरसचा प्रीमियम रेट वाढवला आहे. आता कारचे इंजन नुसार जास्त पैसा खर्च करावा लागणार.

रस्ते व परिवहन मंत्रालयाने आदेश जारी करत मोटर इंश्युरसच्या प्रीमियममध्ये मागील वेळी 2019-20 साठी बदल केला होता. कोरोना महामारी दरम्यान यात कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र आता वेगवेगळ्या इंजन कॅपिसिटीसाठी थर्ड पार्टी बीमा (Third Party Insurance) रेट वाढवत आहे. प्रीमियमचे नवे दर 1 जून पासून लागू होतील

कोणत्या वाहनावर किती खर्च वाढला?

रस्ते व परिवहन मंत्रालया अनुसार, 1,000 सीसी पेक्षा कमी क्षमतेचे इंजनच्या गाड्यांसाठी थर्ड पार्टी बीमा प्रीमियम 2,094 रुपये फिक्‍स केली आहे. तसेच 1,000 सीसी पेक्षा 1,500 सीसीवाल्या गाड्यांवर थर्ड पार्टी इंश्युरंसचा प्रीमियम 3,221 रुपये वाढवून 3,416 रुपये करण्यात आलाय. तर1,500 सीसी पेक्षा वर असलेल्या गाड्यांचा थर्ड पार्टी इंश्युरंस प्रीमियम कमी प्रमाणात वाढविण्यात आलाय

बाइक साठी नवे दर जाहीर

दुचाकी वाहनांकरीता थर्ड पार्टी इंश्युरंस प्रीमियम बदलण्यात आलाय. 1 जूनपासून 150 सीसी ते 350 सीसी असलेल्या बाइकचे प्रीमियम 1,366 रुपये करण्यात येईल तर 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतावाले इंजन चे प्रीमियम आता 2,804 रुपये करण्यात आले.

दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांचा प्रीमियम


75 सीसी पेक्षा कमी क्षमता वाले इंजनच्या बाइकसाठी पाच वर्षाचा सिंगल प्रीमियम 2,901 रुपये ठरविण्यात आलाय तर 75 सीसी ते 150 सीसी च्या मध्ये असलेल्या बाइक वर आता पाच वर्षाचा सिंगल प्रीमियम 3,851 रुपये करण्यात येईल. त्याचप्रमाणे 150 सीसी पेक्षा जास्त आणि 350 सीसी पेक्षी कमी क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांसाठी आता 7,365 रुपये प्रीमियम द्यावा लागेल तर 350 सीसी च्या वर असलेल्या दुचाकी वाहनांसाठी 15,117 रुपये वसूल करण्यात येईल.

ई-कार पर किती प्रीमियम


सरकार ने वैयक्तिक ई-कार साठी थर्ड पार्टी इंश्युरंस प्रीमियम ठरविले आहे. आता 30 किलोवॅट पर्यंत क्षमता असणाऱ्या ई-कार साठी तीन वर्षाचा प्रीमियम 5,543 रुपये करण्यात येईल. यासोबतच 30 किलोवाट ते 65 किलोवाट यामध्ये असलेल्या ई-कार साठी तीन वर्षाचा प्रीमियम 9,044 रुपये करण्यात येणार. 65 किलोवाट पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या ई-कार साठी आता तीन वर्षाचा प्रीमियम 20,907 रुपये घेण्यात येईल.

ई-स्‍कूटरसाठी पाच वर्षाचा प्रीमियम किती?

3 किलोवाट क्षमता असणारे ई-स्‍कूटर साठी पाच वर्षाचा सिंगल प्रीमियम 2,466 रुपये करण्यात आलाय तर 3 किलोवाट ते 7 किलोवाटच्या मध्ये क्षमता असणाऱ्या ई-स्‍कूटरसाठी 3,273 रुपयेचा प्रीमियम करण्यात येणार. तसेच 7 किलोवाट ते 16 किलोवाटची क्षमता असणाऱ्या दुचाकीवर 6,260 रुपये चा प्रीमियम पांच वर्षासाठी असणार तर 16 किलोवाट पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या गाड्यांसाठी 12,849

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT