फोन बिघडलाय ? दुरुस्तीला देताना या चुका टाळा...

फोन दुरुस्तीला देताना आपण अशा काही चुका करतो ज्या नंतर महागात पडू शकतात. त्यामुळे फोन दुरुस्तीला देण्यापूर्वी काय करावे, हे पाहू या.....
phone
phonegoogle

मुंबई : आताच्या काळात क्वचितच कुणी असेल जो स्मार्टफोन वापरत नाही. आपण सर्वच जण बहुतांशी स्मार्टफोनवर अवलंबून असतो. त्यामुळे हा स्मार्टफोन अचानक बंद पडल्यास आपल्याला करमत नाही. आपण लगेच तो फोन दुरुस्तीसाठी एखाद्या दुकानात नेऊन देतो. काहीवेळा फोन पूर्णच बंद पडतो तर काही वेळा सुरू असतो पण अडखळत. अशावेळी फोन दुरुस्तीला देताना आपण अशा काही चुका करतो ज्या नंतर महागात पडू शकतात. त्यामुळे फोन दुरुस्तीला देण्यापूर्वी काय करावे, हे पाहू या.....

phone
KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

बॅकअप घ्या

बऱ्याचदा आपण फोन दुरुस्तीला देताना फक्त सिम काढून घेतो. फोन दुरुस्त करणारी व्यक्ती त्याच वेळी सांगते की फोन दुरुस्त केल्यानंतर सगळा डेटा नाहीसा होईल. त्यामुळे अशी चूक करू नये. फोन दुरुस्तीला देण्याआधी संपूर्ण डेटाचा बॅकअप घ्यावा. यासाठी तुम्ही क्लाऊड सर्विसचा वापर करू शकता किंवा. पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्कसारख्या एक्स्टर्नल डिव्हाइसचा वापर करू शकता.

phone
रेडमीचे Note 11T Pro आणि 11T Pro+ लाँच; जाणून घ्या किंमत

महत्त्वाचे मेसेजेस काढून घ्या

बँकेच्या व्यवहाराच्या मेसेजेससारखे महत्त्वाचे मेसेजेस फोनमधून काढून घ्या.

Banking आणि E Wallet Apps

आजकाल बँका आपल्या सर्व सेवा मोबाईल बँकींगद्वारे देतात. त्यामुळे आपल्या फोनमध्ये विविध बँकांचे मेसेजेस असतात. तसेच दैनंदिन खर्चासाठी UPI Payment चा वापर आपण करतो. त्यामुळे Paytm, Phone Pe, Google Pay यांसारखे अॅप्स आपल्या फोनमध्ये असतात. अशाप्रकारचे अॅप्स फोन दुरुस्तीला देण्यापूर्वी काढून टाकावेत. कारण यात बँक खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com