Moto Edge 20 Pro  Google
विज्ञान-तंत्र

ठरलं तर! 1 ऑक्टोबरला होणार Moto Edge 20 Pro लॉंच; पाहा फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन कंपनी मोटोरोला मोटो एज 20 प्रो, मोटो एज 20 सीरीजचे टॉप मॉडेल भारतात लॉन्च करणार आहे. यापूर्वी मोटो एज 20 फ्यूजन आणि मोटो एज 20 भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन्स दोन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉंच करण्यात येत आहे. आज आपण या फोनबद्दल जाणून घेणार आहोत.

Moto Edge 20 Pro चे फीचर्स

मोटो एज 20 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाईल आणि त्याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर, त्याचबरोबर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम या फोनमध्ये देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Moto Edge 20 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 108MP प्रायमरी सेन्सर, 16MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP टेलिफोटो लेन्स दिलेले असतील. याशिवाय स्मार्टफोनला 4,500mAh ची बॅटरी मिळेल, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी फीचर्स दिली जातील.

किंमत काय असेल?

माय स्मार्ट प्राइसच्या अहवालानुसार, मोटो एज 20 प्रो स्मार्टफोनची किंमत 40,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. हे डिव्हाइस 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध केला जाईल, सध्या कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही.

Moto Edge 20 Fusion

या स्मार्टफोनबद्दल सांगायचे झाल्यास या स्मार्टफोनची किंमत 21,499 रुपये पासून सुरु होते. मोटोरोला एज 20 फ्यूजनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर काम करतो. तसेच यात मीडियाटेक 9800U 5G चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यात पहिला 108MP प्रायमरी सेन्सर, दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2MP डेप्थ सेन्सर दिलेला आहे. तर फोनच्या समोरच्या बाजूला 32 एमपी कॅमेरा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT