Moto G96 Smartphone Launch Features Price esakal
विज्ञान-तंत्र

Moto G96 Launch : एकच झलक, सबसे अलग! लॉन्च होतोय Moto G96 स्मार्टफोन; परडवणारी किंमत अन् दमदार फीचर्स, पाहा एका क्लिकवर..

Moto G96 Smartphone Launch Features Price : मोटोरोला लवकरच भारतात आपला नवीन Moto G96 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. दमदार प्रोसेसर, OLED डिस्प्ले आणि ड्युअल कॅमेऱ्यासह हा फोन Flipkart वर विक्रीस येणार आहे.

Saisimran Ghashi

Moto G96 Mobile Price : स्मार्टफोन मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी Motorola लवकरच आपला नवा दमदार स्मार्टफोन Moto G96 भारतात लॉन्च करणार आहे. Flipkart या आघाडीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या फोनसाठी खास टीझर पेज सध्या लाईव्ह करण्यात आले असून यात फोनच्या डिझाईनपासून ते प्रोसेसर आणि कॅमेरा फीचर्सपर्यंत अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा करण्यात आला आहे.

आकर्षक डिझाईन आणि रंग

Flipkart वर प्रसिद्ध झालेल्या टीझरनुसार, Moto G96 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, पाण्यापासून संरक्षण (IP सर्टिफिकेशन) आणि नव्या आकर्षक रंगांमध्ये फोन उपलब्ध होणार आहे. याआधी मे महिन्यात समोर आलेल्या एका लीकमध्ये या स्मार्टफोनचे चार भिन्न रंग दर्शवले गेले होते आणि Flipkart वरील रंगसंगती त्याच लीकशी सुसंगत आहे.

पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी Snapdragon 7s Gen 2

हा फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह सुसज्ज असणार असून यामुळे वापरकर्त्यांना वेगवान आणि अखंड परफॉर्मन्सचा अनुभव मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळण्याची शक्यता असून त्यामुळे हे मॉडेल मिडरेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये एक बेस्ट पर्याय ठरणार आहे.

OLED डिस्प्ले आणि हायरिफ्रेश रेट

Moto G96 मध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले असणार आहे जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. यामुळे गेमिंग आणि मल्टिमीडिया अनुभव अधिकच स्मूद आणि आकर्षक होणार आहे.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य फोटोग्राफीपासून ते वाइड अँगल शॉट्सपर्यंत सर्व काही सहज शक्य होईल.

बॅटरी आणि टिकाऊपणा

Moto G96 मध्ये 5,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी असण्याची शक्यता असून एका चार्जमध्ये संपूर्ण दिवस आरामात वापरता येईल. याशिवाय, पाण्यापासून संरक्षण करणारी IP रेटिंगसुद्धा फोनला अधिक टिकाऊ बनवते.

विक्री Flipkart वरूनच

Motorola ने अद्याप अधिकृत लाँच डेट घोषित केलेली नसली, तरी Flipkart वरील टीझर पाहता हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. Moto G96 ची विक्री Flipkart वरूनच करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

Kamaltai Gawai : आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार की नाही? कमलताई गवईंनी केले स्पष्ट; म्हणाल्या- आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित पण...

Maharashtra government decision : महायुती सरकारचा मोठा निर्णय; राज्यात आता दुकानं, हॉटेल्ससह इतर अस्थापनं 24 तास उघडी ठेवता येणार!

Alandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर राज्यातील पहिली 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन

2 October Numerology 2025: 'या' मूलांकाच्या लोकांना पैसा मिळणार, प्रेमही फुलणार...; वाचा १ ते ९ अंकांसाठी दिवस कसा असेल?

SCROLL FOR NEXT