Smartphone Selling Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips : स्मार्टफोन विकण्यापूर्वी नक्की करा 'ही' कामे; अन्यथा साडेसाती मागे लागलीच म्हणून समजा

तुम्ही आपला स्मार्टफोन विकून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Sudesh

Smartphone Selling Tips : आजकाल दर आठवल्याचा किमान एक तरी नवीन स्मार्टफोन लाँच होताना दिसत आहे. वारंवार नवीन फोन वापरायचा असेल, तर जुना फोन एक्सचेंजमध्ये किंवा विकणे हा चांगला पर्याय आहे. तुम्हीदेखील आपला स्मार्टफोन विकून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

अ‍ॅपलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये असं स्पष्ट झालं आहे, की गेल्या दोन वर्षांमध्ये जगातील तब्बल 260 कोटी लोकांचा डेटा लीक झाला आहे. ऑनलाईन हॅकिंग आणि इतर गोष्टींसोबतच, जुन्या स्मार्टफोनमधून डेटा लीक होण्याचं प्रमाण भरपूर आहे. जुन्या फोनमधून खासगी फोटो, व्हिडिओ, मेसेज किंवा अन्य गोष्टी चोरी होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही गोष्टी करणं आवश्यक आहे.

कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेस

आपला स्मार्टफोन विकण्यापूर्वी त्यामधून तुमचे सर्व मेसेज आणि कॉल रेकॉर्ड डिलीट करा.

डेटा बॅकअप

तुमचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स अशा गोष्टींचा बॅकअप घेण्यासाठी क्लाऊड स्टोरेजची मदत घेऊ शकता. यासाठी गुगल ड्राईव्ह, गुगल फोटोज, ड्रॉपबॉक्स अशा काही सेवांची मदत तुम्ही घेऊ शकता. (Tech News)

लॉगआऊट

एक-एक करून गोष्टी डिलीट करण्यापेक्षा थेट फोनच रिसेट करण्याचा पर्याय तुम्ही वापरू शकता. मात्र, त्यापूर्वी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, सर्व सोशल मीडिया अ‍ॅप्समधून लॉगआऊट करा.

सोबतच, गुगल अकाउंटमधूनही लॉगआऊट करा. तसंच, पेमेंट अ‍ॅप्स आणि इतर महत्त्वाचे अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करून त्यांचा डेटा फोनमधून डिलीट करणंही गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT