Japan Wooden Satellite eSakal
विज्ञान-तंत्र

Japan Wooden Satellite : जपानने तयार केला जगातील पहिला 'लाकडी उपग्रह', अमेरिका करणार लाँच.. काय आहे कारण?

World’s first wooden satellite to combat space pollution : यामुळे लाकडापासून उपग्रह बनवताना सगळ्यात मोठं चॅलेंज हे मजबूत लाकूड शोधणं होतं. यामुळे मग मॅग्नोलिया लाकडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

Sudesh

Japan-NASA to Launch Satellite made from Wood : जपान आणि अमेरिका मिळून सध्या एका महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमेवर काम करत आहेत. जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी हे देश सज्ज झाले आहेत. लिग्नोसॅट (LignoSat Probe) असं या उपग्रहाचं नाव आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हा उपग्रह लाँच करण्यात येईल.

काय आहे कारण?

हे प्रक्षेपण एक प्रयोग म्हणून केलं जाणार आहे. सध्या अंतराळात हजारो निकामी उपग्रह आहेत. यामुळे पृथ्वीभोवतीचा स्पेस-कचरा (Space-Debris) ही एक मोठी समस्या बनली आहे. यातील कित्येक उपग्रह पृथ्वीवर कोसळण्याचाही धोका असतो. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून लाकडी उपग्रहांचा वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. (Wooden Satellite)

कोणत्या लाकडाचा वापर?

अंतराळातील दबाव, प्रवास सगळ्या गोष्टींना सहन करण्याची क्षमता उपग्रहांमध्ये असते. यासाठी मुख्यत्वे ते मेटलचा वापर करून तयार केले जातात. यामुळे लाकडापासून उपग्रह बनवताना सगळ्यात मोठं चॅलेंज हे मजबूत लाकूड शोधणं होतं. यामुळे मग मॅग्नोलिया लाकडाचा (Magnolia Wood) वापर करण्याचा निर्णय घेतला.

या उपग्रहाची निर्मिती जपानच्या क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी केली आहे. यासाठी सुमिमोटो फॉरेस्टरी कंपनीने देखील सहकार्य केलं आहे. तर याला अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या (NASA) रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. दि गार्डियनने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रदूषणाला बसणार आळा

पृथ्वीच्या वातावरणात जे उपग्रह पुन्हा प्रवेश करतात, ते खाली कोसळत असताना हवेशी घर्षण होऊन जळून जातात. यावेळी त्यातून लहान-लहान अ‍ॅलुमिना कण (Alumina Particles) हवेत पसरतात. हे कण पृथ्वीच्या वातावरणात कित्येक वर्षं टिकून राहतात, ज्यामुळे प्रदूषणाचा धोका आहे.

लाकडी उपग्रहामुळे हा धोकाही कमी होणार आहे. लाकडाचा उपग्रह असल्यामुळे पृथ्वीवर कोसळत असताना तो पूर्णपणे जळून जाणार आहे. लाकूड हे बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याचा पर्यावरणाला धोका नसल्याचं क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT