विज्ञान-तंत्र

Google Doodle Today : गुगलनेही दिल्या भारताला 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; बनवलं खास डूडल!

Aishwarya Musale

भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. गुगलनेही प्रजासत्ताक दिनानिमित्त डूडल बनवले आहे. ज्यामध्ये त्याने अनेक स्क्रीन दाखवल्या आहेत, ज्यामध्ये एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाइटमध्ये परेड दाखवली आहे. गुगलने आधी दोन टीव्ही आणि नंतर एक मोबाईल दाखवला. हे डूडल वृंदा जावेरी यांनी बनवले आहे.

गेल्या वर्षी यांनी डूडल बनवले होते

गेल्या वर्षी गुजरातमधील कलाकार पार्थ कोठेकर यांनी भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे डूडल तयार केले होते. डूडलला हँड कट पेपरच्या मदतीने तयार करण्यात आले होते. यात नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर होत असलेले प्रदर्शन रेखाटले होते. डूडल कलाकृतीला खूपच बारकाईने हाताने कापलेल्या कागदापासून तयार करण्यात आले होते. डूडलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडची झलक दिसत होती. यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, सीआरपीएफ मर्चिंग दल, आणि मोटर सायकल सवार याचा समावेश करण्यात आला होता.

यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Blast : घरातला बेड गुडघ्यापर्यंत हवेत उडाला... स्फोटाने हादरला दीड किलोमिटरचा परिसर, काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी?

Dombivli MIDC Blast Live Update: Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात दोन जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक जखमी

Pune Crime : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी 16 आरोपींविरुद्ध 2000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

Nandigram Violence: पुन्हा पेटलं नंदीग्राम! तृणमूल काँग्रेससोबत झालेल्या संघर्षात भाजप महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर तणाव

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा, बँक-आयटी शेअर्स तेजीत

SCROLL FOR NEXT