China and Ukraine Innovate to Safeguard Earth from Asteroids esakal
विज्ञान-तंत्र

Asteroid Defense : लघुग्रहाचा धोका टळणार ; युक्रेन आणि चीनच्या संशोधकांचं पृथ्वीला वाचवण्याचं मिशन

China-Ukrain Research : 'रोटेटिंग-ड्रिफ्ट-स्कॅन (RDS)', चार्ज-कपल्ड डिवाइस (CCD) तंत्रज्ञानाचा केला जातोय वापर

सकाळ डिजिटल टीम

Research : पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणाऱ्या लघुग्रहाचे (NEA) अचूक स्थान आणि त्यांच्या कक्षेचा मार्ग निश्चित करण्यासाठी चीन आणि युक्रेनमधील संशोधकांचा संयुक्त तज्ञ गट याबाबतचे निरीक्षण करत आहे.

हे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत येण्याची शक्यता असते त्यामुळे पृथ्वीला धोका असल्याची संभावना निर्माण होते. नव्याने शोधलेल्या लघुग्रहाची कक्षा लवकरात लवकर निश्चित करण्यासाठी सतत त्यांचे निरीक्षण करणे,कक्षेचा वेगाने अभ्यास करणे आवश्यक आहे.

परंतु, जलद गतीने फिरणाऱ्या या खगोलीय पिंडांचे दीर्घ काळ निरीक्षण करताना त्यांची प्रतिमा धुरसट दिसते. त्यामुळे अचूक मापन करणे कठीण होते.

Chinese Academy of Sciences शांघाय खगोलशास्त्रीय वेधशाळा (SHAO) आणि मायकोलाइव खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या (युक्रेन) संशोधकांनी एक नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले आहे. 'रोटेटिंग-ड्रिफ्ट-स्कॅन (RDS)' चार्ज-कपल्ड डिवाइस (CCD) तंत्रज्ञान वापरून दीर्घ काळ निरीक्षण केल्यानंतर लघुग्रहांची बिंदू स्वरूपातील (point source) प्रतिमा मिळवणे शक्य झाले.

या संशोधनासाठी २०१९ ते २०२३ दरम्यान चीनच्या शीआन शहरातील ५० सेमी व्यासाच्या टेलिस्कोपने आणि २०११ ते २०२२ दरम्यान युक्रेनच्या मायकोलाइव शहरातील ५० सेमी व्यासाच्या टेलिस्कोपने जवळपास ५०० लघुग्रहांची ११,००० पेक्षा जास्त स्थानिक मापने करण्यात आली.

अस्ट्रोनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लहान क्षमतेच्या दूरदर्शकांचे जाळे तयार केले जाऊ शकते. त्यामुळे लघुग्रह धोक्यापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी जागतिक लघुग्रह निरीक्षण प्रणाली अधिक प्रभावीपणे कार्यरत होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT