New Sim Card Rules esakal
विज्ञान-तंत्र

New Sim Card Rules : १ डिसेंबरपासून बदलणार सिमकार्ड खरेदीचे नियम

केंद्र सरकार १ डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदीचे नियम बदलणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

New Sim Card Rules : १ डिसेंबर २०२३ पासून देशात अनेक बदल होणार आहेत. त्या संदर्भातीलच एक मोठा बदल सिमकार्डच्या बाबतीत होणार आहे. केंद्र सरकार १ डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदीचे नियम बदलणार आहे.

हे नियम पूर्वी १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात येणार होते. मात्र, सरकारने आता हे नियम देशात लागू करण्याचा निर्णय १ डिसेंबरपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जर तुम्ही सिमकार्ड डीलर असाल किंवा सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला या नियमांची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. सिम कार्ड संदर्भातील हे नवीन नियम तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये जारी करण्यात आली होती नवी गाईडलाईन

या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र सरकारने सिमकार्ड संदर्भात एक नवी गाईडलाईन जारी केली होती. ही गाईडलाईन आता १ डिसेंबरपासून देशात लागू केली जाणार आहे.

ही नवी मार्गदर्शक तत्वे जारी करताना सरकारने असे म्हटले होते की, गेल्या ८ महिन्यांमध्ये देशातील ५२ लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. जवळपास ६७ हजार सिम कार्ड डीलर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

यासोबतच बनावट सिमकार्ड टोळीत सहभागी असलेली सुमारे ६६ हजार व्हॉट्सअ‍ॅप खातीही बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती सरकारने त्यावेळी दिली होती.

सिम डीलरचे होणार व्हेरिफिकेशन

सरकारच्या या नव्या नियमानुसार सिमकार्डची विक्री करणाऱ्या सर्व डीलर्सला आता पोलीस पडताळणी करावी लागणार आहे. ही पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

जर एखाद्या सिम कार्ड डीलरने पोलिस पडताळणी केली नाही आणि मोठ्या प्रमाणात सिमकार्ड्सची विक्री केली तर त्याला १० लाखांचा दंड होऊ शकतो.

त्यासोबतच, त्या व्यक्तीला तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे, सर्व सिमकार्ड डीलर्सना अनिवार्यपणे रेजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

डुप्लिकेट सीमकार्डसाठी आधार आवश्यक

जर एखादी व्यक्ती काही कारणांमुळे त्याच्या उपस्थित मोबाईल नंबरसाठी नवीन सिमकार्ड खरेदी करणार असेल तर, तुम्हाला पुन्हा आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा (अ‍ॅड्रेस प्रूफ) द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT