One Vehicle One Fastag eSakal
विज्ञान-तंत्र

One Vehicle One Fastag : देशभरात लागू झाला 'वन व्हीकल वन फास्टॅग' नियम; काय आहे कारण? जाणून घ्या

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत.

Sudesh

One Vehicle One Fastag : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI चा 'एक वाहन एक फास्टॅग' नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. यापूर्वी मार्च महिन्यात हा नियम लागू करण्यात येणार होता, मात्र केंद्राने एक महिन्याचा दिलासा देत याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली होती. 1 एप्रिलपासून मात्र हा नियम लागू झाला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत. ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेले एकाहून अधिक फास्टॅग आहेत, त्यांचे एक सोडून इतर फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद होतील. आपले इतर फास्टॅग बंद करण्यासाठी, वा त्यातील बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी RBI आणि PPBL ने ग्राहकांना 15 मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

कशामुळे लागू झाला नियम?

इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणं किंवा एकाच वाहनाला अनेक फास्टॅग लिंक करणं बंद होणार आहे.

देशात 8 कोटी फास्टॅग यूजर्स

भारतातील सुमारे 98 टक्के वाहनांना फास्टॅग लिंक होऊ शकतं. सध्या देशात 8 कोटींपेक्षा अधिक फास्टॅग यूजर्स आहेत. यामध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. वाहन टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर फास्टॅग स्कॅन होऊन, वॉलेटमधून आपोआप टोलची किंमत कापली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT