nokia 2660 flip phone launched in india with 4g lte features specifications price
nokia 2660 flip phone launched in india with 4g lte features specifications price  
विज्ञान-तंत्र

नोकियाचा नवीन Nokia 2660 Flip फीचर फोन लॉंच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन ब्रँड नोकियाने आपला नवीन फीचर फोन Nokia 2660 Flip भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 4G LTE कनेक्टिव्हिटी सह सादर करण्यात आला आहे. नोकियाची सीरीज 30+ ऑपरेटिंग सिस्टम फोनमध्ये देण्यात आली असून नोकिया 2660 फ्लिपमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. याशिवाय, या फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर आणि 48 MB रॅमसह 128 MB इंटरनल स्टोरेज सपोर्ट करण्यात आला आहे. चला फोनचे इतर फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

नोकिया 2660 फ्लिप नोकिया 2660 फ्लिपची किंमत ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. 128 MB स्टोरेजसह फोनच्या 48 MB रॅमची किंमत 4,699 रुपये आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून खरेदी करता येईल.

फोनचे स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा

नोकियाचा हा फोन प्रीमियम डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल-सिम आणि 4जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच फोन दोन डिस्प्लेसह येतो, QVGA रिझोल्यूशनसह 2.8-इंचाचा डिस्प्ले आणि QQVGA रिझोल्यूशनसह 1.77-इंचाचा दुसरा डिस्प्ले मिळतो. त्याच वेळी, Unisoc T107 प्रोसेसर आणि 48 MB रॅमसह फोनमध्ये 128 MB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, जो LED फ्लॅशसह येतो.

नोकिया 2660 फ्लिप बॅटरी

फोनमध्ये 1450mAh काढता येणारी बॅटरी आहे, जी 2.75W चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की हा सिंगल 4G सिमवर स्टँडबाय मोडवर 24.9 दिवस चालवला जाऊ शकतो, तर सामान्य वापरात याला 6.5 तासांचा टॉकटाइम मिळतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v4.2, मायक्रो-USB 2.0 पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT