flipkart big billion days sale smartphone discount esakal
विज्ञान-तंत्र

Big Billion Days : खुशखबर! नथिंग 5G फोन मिळतोय 12,999 रुपयांत; एकदम ब्रँड फीचर्सच्या स्मार्टफोनवर महा डिस्काऊंट

flipkart big billion days nothing phone discount offers : CMF फोन 1 आणि नथिंग फोन 2a हे फोन खूपच कमी किंमतीत उपलब्ध होणार ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Saisimran Ghashi

Nothing Phone Discount Offers : नथिंग कंपनीच्या सीईओ कार्ल पे यांनी दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या फेस्टिव्हल सेलबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या कंपनीचे CMF फोन 1 आणि नथिंग फोन 2a हे फोन खूपच कमी किंमतीत उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चला तर, या जबरदस्त ऑफरची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये अनेक फोनवर आकर्षक ऑफर्स येणार आहेत, पण नथिंग फोनच्या ऑफर्सबद्दल अजून कोणतीही माहिती नव्हती. पण आता कंपनीचे सीईओ कार्ल पे यांनी स्वतःच फेस्टिव्हल ऑफरची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, CMF फोन 1 फक्त 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. आधी याच फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये होती. म्हणजेच, नथिंग कंपनी या फोनवर तब्बल 3,000 रुपयांची मोठी सूट देणार आहे. विशेष म्हणजे, हा फोन आधीच कमी किंमतीत मिळत होता आणि आता मिळणाऱ्या फेस्टिव्हल ऑफरमुळे ही खूपच आकर्षक डील असणार आहे.

या ऑफरमध्ये नेमका काय समावेश आहे याची अजून माहिती नाही. बँक ऑफर आणि थेट डिस्काउंट असा या ऑफरचा फॉरमेट असू शकतो, पण अजून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. याबाबतची सविस्तर माहिती येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.

नथिंग फोन 2a घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. या फोनची किंमत देखील लवकरच कमी होणार आहे. कार्ल पे यांनी सांगितलं आहे की, फेस्टिव्हल सेलमध्ये फोन 2a फक्त 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. या फोनची भारतात सुरुवातीची किंमत 23,999 रुपये होती. म्हणजेच, कंपनी या फोनवर 5,000 रुपयांची सूट देऊ शकते. ही सूट बँकेच्या ऑफरवर अवलंबून असू शकते, पण याबाबत अजून कोणतीही पुष्टी नाही.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना एक दिवसानंतर म्हणजे 28 सप्टेंबरपासून ही सेल सुरु होईल. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, नथिंग फोनच्या ऑफर्सची घोषणा फ्लिपकार्ट 22 सप्टेंबरला करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT