Ola Electric expands product line with Roadster e-motorcycle series 
विज्ञान-तंत्र

ओलाची पहिली इलेक्ट्रिक बाईक सीरीज लाँच! सिंगल चार्जमध्ये आरामात होईल मुंबई-पुणे राऊंड ट्रीप; किंमत फक्त 'इतकी'

Roadster e-motorcycle series price and features : या बाईकचे तीन व्हेरियंट रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो सादर करण्यात आले आहेत. हा प्रत्येक व्हेरियंट हा वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह देण्यात आले आहेत.

रोहित कणसे

देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपन्यांपैकी एक ओला इलेक्ट्रिकने मोठ्या प्रतिक्षेनंतर आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल रेंज Ola Roadster अधिकृतरित्या लाँच केली आहे.

या बाईकचे तीन व्हेरियंट रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो सादर करण्यात आले आहेत. हा प्रत्येक व्हेरियंट हा वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बाईक रेंजच्या बेस मॉडलची म्हणजेच Ola Roadster X ची किंमत फक्त 74,999 रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होतेय.

सीरिजची किंमत किती?

एंट्री लेव्हल व्हेरियंट रोडस्टर एक्स बद्दल बोलायचे झाल्यास, हे मॉडल तीन बॅटरी पॅक 2.5kWh, 3.5kWh आणि 4.5kWh मध्ये येते. ज्याची किंमत क्रमाने 74,999 रुपये, 84,999 रुपये आणि 99,999 रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे.

तर मिड व्हेरियंट म्हणजे रोडस्टर देखील 3kWh, 4.5kWh आणि 6kWh च्या तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकमध्ये देण्यात आली आहे. ज्यांची किंमत 1,04,999 रुपये, 1,19,999 रुपये आणि 1,39,999 रुपये (एक्स शोरूम, बेगळुरू) आहे.

तर हायर व्हेरियंट म्हणजेच रोडस्टर प्रो साठी कंपनीने फक्त दोन बॅटरी पॅक्स दिले आहेत 8kWh आणि 16kWh यांच्या किमती अनुक्रमे 1,99,999 रुपये आणि 2,49,999 रुपये (एक्स शोरूम, बेंगळुरू) आहे.

पावर, रेंज आणि परफॉर्मन्स

बॅटरी कॅपसीटी आणि किंमत सोडली तर पहिले दोन वेरियंट्स रोडस्टर एक्स आणि रोडस्टर लुक आणि डिझाइनध्ये बऱ्यापैकी सारखेच आहेत. रोडस्टर एक्सचे टॉप मॉडेल म्हणजेच 4.5kWh हे व्हेरियंट सिंगल चार्ज मध्ये 200 किमी रेंज देते. या व्हेरियंटची टॉप स्पीड 124 किमी प्रति तास आहे.

तर दुसरे मॉडल रोडस्टरचे टॉप 6kWh व्हेरियंट सिंगल चार्जमध्ये 248 किमी रेंज देते. या व्हेरियंटची टॉप स्पीड 126 किमी प्रतितास इतकी आहे.

रोडस्टर प्रोबद्दल सांगायचे झाल्यास याची किंमत सर्वाधिक आहे. याचे टॉप मॉडेल जे 16kWh बॅटरीपॅकसह येते, याबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाइक सिंगल चार्जमध्ये 589 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये 52kW ची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे जी 105 Nm टॉर्क जनरेट करते. याची टॉप स्पीड देखील १९४ किमी प्रतितास आहे. हे व्हेरियंट फक्त 1-6 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड घेण्यास सक्षम आहे.

बुकिंग आणि डिलीव्हरी

ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि सीइओ भावेश अग्रवाल यांनी सांगितलं की अधिकृतरित्या या बाईक्सची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या बाईक्स कंपनीच्या ऑफिशीयल वेबसाइटवर बुक करता येतील. यासोबत कंपनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये याची डिलीव्हरी सुरू करण्याचे नियोजन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT