OnePlus 12
OnePlus 12  esakal
विज्ञान-तंत्र

OnePlus 12 : तारीख ठरली ! स्पेशल स्क्रीन असलेला वनप्लसचा flagship फोन येतोय

सकाळ डिजिटल टीम

OnePlus 12 : वनप्लसने पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन वनप्लस ओपननंतर आणखी एक नवीन फोन तयार केला आहे. ही स्मार्टफोन कंपनी लवकरच OnePlus 12 लॉन्च करू शकते. कंपनीने अलीकडेच या फोनचे अनावरण केले आहे.

नवा हँडसेट अनेक फिचर्ससह लाँच केला जाईल. OnePlus 11 गेल्या वर्षी लॉन्च झाला होता, जो ग्राहकांना खूप आवडला होता. आता OnePlus 12 देखील खास फीचर्ससह लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. आणि या फोनचे फिचर्स पाहून ग्राहक खूश होतील यात काही शंकाच नाही.

रिपोर्ट्सनुसार, OnePlus 12 या वर्षी डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरत होत्या. मात्र, वनप्लसने काही फीचर्सची माहिती शेअर केली आहे. हँडसेट निर्मात्या कंपनीने नवीन स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल माहिती दिली आहे. चीनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान OnePlus 12 चे अनावरण करण्यात आले.

OnePlus 12: तुम्हाला पहिल्यांदाच अशी स्क्रीन मिळेल

चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एका पोस्टमध्ये, OnePlus ने आगामी स्मार्टफोनबद्दल मोठा दावा केला आहे. त्यानुसार, OnePlus 12 हा DisplayMate A+ रेट केलेला X1 "ओरिएंटल स्क्रीन" असणारा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन 2K रिझोल्यूशन आणि 2,600 nits पीक ब्राइटनेससह येईल.

OnePlus 12 : डिस्प्ले फीचर

एका अहवालात, कंपनीने दावा केलाय की "ओरिएंटल स्क्रीन" डिस्प्ले P1 चिपसह येईल. XI डिस्प्लेची लाईफ सरासरीपेक्षा दुप्पट असल्याचे मानले जाते. त्याच वेळी, पॅनेलसह त्याची कार्यक्षमता 90 टक्क्यांनी सुधारली आहे. याशिवाय बॅटरीचा वापरही 13 टक्क्यांनी कमी झाला आहे.

OnePlus 12: संभाव्य वैशिष्ट्ये

OnePlus 12 ची रचना OnePlus 11 सारखी असू शकते. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट सोबत येईल अशी अपेक्षा आहे. कॅमेरा फीचर बद्दल बोलायचं झाल्यास, या फोनमध्ये Sony IMX966 50MP कॅमेरा, अल्ट्रा-वाइड टेलीफोटो लेन्ससह 48MP कॅमेरा आणि 64MP कॅमेरा दिला जाईल.

या फोनची बॅटरी 5,400mAh, 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसोबत येईल. OnePlus च्या नवीन स्मार्टफोनमध्ये Android 14 वर आधारित OxygenOS 14 ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT