OnePlus Nord 3 Launch date Specification launch timeline  Leaked
OnePlus Nord 3 Launch date Specification launch timeline Leaked 
विज्ञान-तंत्र

OnePlus Nord 3 : येतोय वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन! मिळणार 16GB रॅम अन् 50MP कॅमेरा

सकाळ डिजिटल टीम

OnePlus Nord 3 Launch : OnePlus ने अलीकडेच त्याचे प्रीमियम फोन OnePlus 11 आणि OnePlus 11R लाँच केले. त्यानंतर आता चीनी स्मार्टफोन कंपनी आपल्या Nord सीरीजचा नवीन हँडसेट OnePlus Nord 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी OnePlus Nord 3 चे फीचर्स लीक झाले होते. आता एका नवीन मीडिया रिपोर्टमध्ये डिव्हाइसची सर्व फीचर्स आणि लॉन्च टाइमलाइन उघड झाली आहे.

OnePlus Nord 3 लाँच - टाइमलाइन डटेल्स

टिपस्टर Onleaks चा हवाला देत MysmartPrice च्या रिपोर्टमध्ये डिव्हाइसच्या सर्व फीचर्सचा उल्लेख करण्यात आला आहे. OnePlus Nord 3 जून आणि जुलैच्या मध्यात जागतिक स्तरावर लॉन्च होईल. महत्वाचे म्हणजे OnePlus Nord सीरीजचा OnePlus Nord 2 चा मागील फोन देखील जुलै 2021 मध्ये सादर करण्यात आला होता.पहील्या जनरेशनचा OnePlus Nord 2 देखील जुलै 2020 मध्ये लॉन्च झाला होता.

OnePlus Nord 3 - स्पेसिफीकेशन्स

रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की OnePlus Nord 3 मध्ये फुलएचडी+ रिझोल्यूशनसह 6.72-इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले असू शकतो. हँडसेटमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. आगामी नॉर्ड सीरीज स्मार्टफोन ऑक्टा-कोर डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड असेल. हा फोन 8 GB रॅम आणि 16 GB रॅम सह 128 GB आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर OnePlus Nord 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असल्याची नोंद आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. हँडसेटला पॉवर करण्यासाठी, 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल. डिव्हाइसमध्ये अलर्ट स्लाइडर देखील दिला जाईल.

यापूर्वी OnePlus Nord CE 3 ची लाईव्ह इमेज समोर आली होती. लीक झालेल्या इमेजनुसार, Nord CE 3 ला ग्लॉसी बॅक पॅनल आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध असेल. स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 12 GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT