OnePlus Open
OnePlus Open esakal
विज्ञान-तंत्र

OnePlus Open ची पहिली झलक, लाँचिंगपूर्वीच अभिनेत्री अनुष्काच्या हाती दिसला फोन, व्हिडिओ होतोय व्हायरल

साक्षी राऊत

OnePlus Open Smartphone : वनप्लस कंपनी लवकरच त्यांचा नवा फोन लाँच करणार आहे जो फोल्डेबल असेल. कंपनी हा फोन याच महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहे. वनप्लसचा हा लेटेस्ट फोन लाँचिंगपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या हाती दिसला. अनुष्काच्या हाती फोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. रिपोर्ट्सनुसर हा फोन वनप्लस असू शकतो जो या ब्रँडचा पहिलाच फोल्डिंग फोन असणार आहे.

पहिल्यांदाच अनुष्काच्या हाती दिसला फोन

अनेक वनप्लस फोनप्रमाणे अनुष्काच्या हातातीलसु्द्धा फोन वनप्लस अशू शकतो असा अंदाज होता मात्र अनुष्का व्हिडिओमध्ये हा फोन वापरताना आणि अनफोल्ड करताना स्पष्टपणे दिसतेय. ज्यातून हा फोन वन प्लसचे अपकमिंग लाँच होणारे मॉडेल असल्याचे दिसून येते.

कंपनी लाँचिंगपूर्वी या फोनचे नाव OnePlus Open असणार असल्याचे सांगितले आहे. हा स्मार्टफोन फेस्टिव्ह सीजनमध्ये लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

हा फोन साइझमध्ये सुद्धा मोठा असल्याचे दिसते. रिपोर्ट्सनुसार Oppo Find N2 किंवा Pixel Fold सह लाँच होऊ शकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून या मोबाईलचा साइझ नेमका केवढा आहे हे सांगणं कठीण आहे. (Technology)

स्पेसिफिकेशन्स

OnePlus Open ऑक्टॅकोर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार यात 7.8 inch च्या 2k AMOLED डिस्प्लेसह मिळू शकतो. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळेल. शिवाय यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याची मेन लेंस 50 MP असेल.

हा फोन OIS सपोर्टसह असेल. याशिवाय 48MP वाइड अँगल लेंस आणि 32MP पेरीस्कोपिक लेंससह असेल. फोनमध्ये 3x Zoom फिचरही असेल. या फोनचा फ्रंट कॅमेरा 32MP सेल्फी कॅमेरा असणार असल्याचेही सांगण्यात येतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT